स्वाभिमानीची बुलंद तोफ, राजू शेट्टींचा खंदा समर्थक, प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकरांचा राजीनामा!

राजू शेट्टींचा खंदा समर्थक आणि स्वाभिमानीची बुलंद तोफ रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar resigns ) यांनी राजीनामा दिला आहे.  रवीकांत तुपकर  (Ravikant Tupkar resigns) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

स्वाभिमानीची बुलंद तोफ, राजू शेट्टींचा खंदा समर्थक, प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकरांचा राजीनामा!
Follow us
| Updated on: Sep 26, 2019 | 6:56 PM

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना धक्का बसला आहे. राजू शेट्टींचा खंदा समर्थक आणि स्वाभिमानीची बुलंद तोफ रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar resigns ) यांनी राजीनामा दिला आहे.  रवीकांत तुपकर  (Ravikant Tupkar resigns) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भेट घेतली. त्यामुळे रवीकांत तुपकर येत्या काही दिवसात भाजपमध्ये दिसले तर नवल वाटू नये.

राजीनामा राजू शेट्टींना सादर

रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसंच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला आहे. “मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजुर करावा” असं रवीकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

दरम्यान, रवीकांत तुपकर यांचा राजीनामा अद्याप मला प्राप्त झालेला नाही. तो माझ्याकडे आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं राजू शेट्टी म्हणाले.

सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

रवीकांत तुपकर मेहनती आहेत आणि त्यांनी मोठं काम केलं आहे. स्वाभिमानी पक्षाने त्यांना आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. माझी आणि त्यांची 2 ते 3 वेळा भेटी झाल्या. मात्र त्यामध्ये पक्ष प्रवेशाबाबत चर्चा नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

कोण आहेत रवीकांत तुपकर?

  • रवीकांत तुपकर हे बुलडाणा जिल्ह्यातील सावळा या गावचे आहेत.
  • राहण्यासाठी ते बुलडाण्यात असतात
  • राजू शेट्टींसोबत चळवळीत काम केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील अग्रणी चेहरा
  • बुलडाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, आता प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती
  • सदाभाऊ खोत यांनी संघटना सोडल्यानंतर, स्वाभिमानीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळख
  • तुपकर हे खादी ग्रामोद्योग महामंडळावर होते, पण स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला
  • लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण जागा न मिळाल्यामुळे माघार
  • 2014 च्या विधानसभेला बुलडाण्यातून चिखलीतून इच्छा होती, पण माघार
  • आता चिखलीतूनच इच्छुक, भाजपच्या संपर्कात
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.