Rayat Shikshan Sanstha: रयतला भ्रष्टाचार पोखरतोय? शरद पवारांसमोर सर्वात मोठं आव्हान

Rayat Shikshan Sanstha : आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत सध्या चर्चेत आहे ती दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने.

Rayat Shikshan Sanstha: रयतला भ्रष्टाचार पोखरतोय? शरद पवारांसमोर सर्वात मोठं आव्हान
रयत शिक्षण संस्थेतील नेमका वाद काय?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 2:07 PM

सातारा : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने चर्चेत आहे. केवळ दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनाम्याने फरक तो काय? असा प्रश्न पडू शकतो. मात्र ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Rayat Shikshan Sanstha) आहेत, त्यांच्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा घेणं आणि त्या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द शरद पवारांना साताऱ्यात जावं लागणं यावरुन या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे (Bhausaheb Karale) यांनी पुण्यात, तर माजी सचिव अरविंद बुरुगले (Arvind Burugale) यांनी साताऱ्यात रयत काऊन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा सोपवला.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी (Karmaveer Bhaurao Patil ) गरीब, वंचितांसाठी ज्या शिक्षण संस्थेची कवाडं खुली केली, तीच ही रयत शिक्षण संस्था आशियातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र आता या शिक्षण संस्थेत सध्या प्राध्यापक भरती घोटाळ्याचा गंध येत असल्याने, स्वत: पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

कर्मवीर भाऊरावांच्या कडक शिस्तीची अदृश्य काठी घोटाळेबाजांच्या माथी बसलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काऊन्सिलिंगची बैठक नियोजित होती. शरद पवार हे बैठकीसाठी धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात उपस्थित राहिले. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील विविध विषयांवर चर्चा पार पडली.

रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने बुधवारी (16 डिसेंबर) पुण्यात माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांचा राजीनामा संस्थेने घेतला होता. त्यानंतर काल गुरुवारी झालेल्या बैठकीत या विषयावर महत्वपूर्ण चर्चा पार पडली.

सातारा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचाही राजीनामा घेतल्यामुळे, रयत शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा हा प्राध्यापक भरतीचा विषय चर्चेत आला आहे. मात्र यावेळी शरद पवारांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करीत, अनेकांची कानउघाडणी केली. या प्रकरणावर संस्थेतील कोणही बोलण्यास तयार नसल्याने, राजीनाम्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बैठकीला मात्र प्रसारमाध्यमांना पूर्णपणे मज्जाव केला होता.

प्राध्यापक भरतीत घोटाळ्याचा आरोप

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचं मूळ हे प्राध्यापक भरती प्रकरणात आहे. पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी प्राध्यपक भरती झाली. मात्र याच भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या आरोपात कितपत तथ्य आहे हे कालांतराने समोर येईल.

सेवा ज्येष्ठता डावलून निवड?

ज्या प्राध्यापकांनी संस्थेसाठी काम केलं, त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून ‘भलत्याच’ प्राध्यापकांची रयतमध्ये निवड केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच जे पात्र होते, ज्यांची सेवाज्येष्ठता होती, त्यांना डावललं म्हणजे काहीतरी आर्थिक गडबड आहे, असा काही सदस्यांचा आरोप आहे. त्यावरुनच माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे घेण्यात आले.

दोघांवर नेमके आरोप कोणते?

ज्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. माजी सचिव डॉ. बी के कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांनी पदांचा गैरवापर केल्याचा आरोप आहेच. पण त्याशिवाय त्यांनी प्राध्यापक भरतीत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.

“पदावर असताना काहींना हाताशी घेऊन त्यांचा बुद्धीबळातील सोंगट्यांप्रमाणे वापर केला. जे ऐकतील त्यांना प्रेमाने, जे ऐकणार नाहीत त्यांना पैशाने अशापद्धतीने साम-दाम-दंड भेद वापरुन आपली पोळी भाजली” असा आरोप करण्यात आला आहे.

रयत शिक्षण संस्था नेमकी काय आहे?

जगभरात ऑक्स्फर्ड, केंब्रिज अशा विद्यापीठांचा दबदबा जसा आहे, तसा भारतात IIT, IIM यासारख्या संस्था नावाजल्या जातात. त्याच तोडीची आणि प्रामुख्याने तळागाळात पोहोचलेली शिक्षण संस्था म्हणून रयतची ख्याती आहे. गरीब, वंचित घटकातील मुलांना शिक्षण या एकाच ध्येयाने कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयतचं बीज पेरलं आणि पुढे त्याचा वटवृक्ष बनला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षापूर्वी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, या ध्येयाने शिक्षण संस्था सुरु झाली. कमवा आणि शिका या आता सुरु असलेल्या योजना कर्मवीर अण्णांनी शंभर वर्षापूर्वी सुरु केली. मुलांच्या शिकवण्या घेता घेता रयतची स्थापना झाली आणि रोपट्याचं वटवृक्ष बनत गेलं. सध्या शरद पवार हे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.

रयतचा पसारा

रयतचा पसारा महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत आहे. यामध्ये 739 शाखा आहेत तर 14 हजार 118 शिक्षक वर्ग आहे. सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, रयतच्या पसाऱ्याबाबत बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रात 2017 पर्यंत रयतची 41 महाविद्यालये, 439 हायस्कूल, कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसती गृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेती महाविद्यालये, 5 तंत्र विद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 डी.एड. महाविद्यालये, 45 प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा, शाळेल्या मुलांसाठी 68 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 58 आयटीआय आहेत. या संस्थेत जवळपास साडेचार लाख विद्यार्थी आणि 15 हजार शिक्षक आणि सेवक कार्यरत आहेत.

शरद पवारांची भूमिका आणि सध्याचे पदाधिकारी

देशाच्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राची खडान् खडा माहिती असणारा नेता म्हणून शरद पवारांची ओळख. पवार हे यशवंतराव चव्हाणांचे पठ्ठेशिष्य. यशवंतरावांचे संस्कार, काँग्रेसची शिकवण आणि कर्मवीर भाऊरावांसारख्यांचा प्रभाव शरद पवारांवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार या संस्थेचा कारभार पाहात आहेत. कर्मवीरांच्या संस्थेचा झेंडा फडकवत ठेवण्याची जबाबदारी पवारांवर आहे. ते काम ते आतापर्यंत निष्ठेने करत आलेले आहेत. मात्र प्राध्यापक भरती घोटाळ्याचा गंध आल्याने पवार चांगलेच नाराज झाल्याची चर्चा आहे.

जून 2020 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली. चेअरमनपदी पुन्हा डॉक्टर अनिल पाटील यांची वर्णी लावण्याचं निश्चित करण्यात आलं. अनिल पाटील हे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचे नातू आहेत. संस्थेच्या सचिवपदी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली. त्याचबरोबर पाच उपाध्यक्ष, 24 जणांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली.

VIDEO शरद पवारांनी रयतच्या बैठकीला उपस्थिती लावली

संबंधित बातम्या 

Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.