…. म्हणून सुषमा स्वराज एनडीएच्या डिनर बैठकीला अनुपस्थित
नवी दिल्ली : एग्झिट पोलनंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सर्व घटकपक्षांना आज स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, लोजपचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह एनडीएच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यात कोठेच […]
नवी दिल्ली : एग्झिट पोलनंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सर्व घटकपक्षांना आज स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, लोजपचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह एनडीएच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यात कोठेच दिसल्या नाहीत. त्यांच्या गैरहजेरीबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले, मात्र त्यामागे काही वेगळेच कारण आहे.
सुषमा स्वराज एनडीएच्या मित्रपक्षांना दिलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याचे एकमेव कारण आहे त्यांची शांघाय सहकार्य संस्थेची (SCO) किर्गीजस्तानमधील बैठक. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज एससीओच्या 2 दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी आज किर्गीजस्तानमधील बिश्केकमध्ये पोहचल्या आहेत. त्यावेळी स्वराज यांचे तेथील पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
स्वराज यांच्या या बैठकीत दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (सीएफएम) बैठकीत एससीओचा पूर्ण सदस्य म्हणून सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे, सीएफएम आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करण्यासोबत बिश्केकमध्ये 13-14 जूनला होत असलेल्या एससीओ शिखर संमेलनाच्या तयारीचाही आढावा घेईल. सुषमा स्वराज एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच किर्गीजचे राष्ट्रपती सूरनबाय जीनबेकोव यांचीही भेट घेतील.
First engagement in Bishkek
EAM @SushmaSwaraj had a productive discussion with Kyrgyz Foreign Minister Aidarbekov on all aspects of bilateral relations, including in political & defence, trade & investment, health, capacity building and people-to-people ties pic.twitter.com/F6oVVHZXSF
— Raveesh Kumar (@MEAIndia) May 21, 2019
भारत 2017 मध्ये या समुहाचा पूर्ण सदस्य झाला. एससीओची स्थापना 2001 मध्ये शांघायमध्ये झाली. रुस, चीन, किर्गीज गणराज्य, कजाकिस्तान, तजाकिस्तान आणि उज्बेकिस्तानचे राष्ट्रप्रमुख या सर्वांनी ही स्थापना केली होती. 2017 मध्ये भारतासह पाकिस्तानला एससीओचे सदस्यत्व देण्यात आले होते.