Sanjay Raut : ‘गुवाहाटीतील बंडखोर जिवंत प्रेतं आहेत’ राऊतांच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर, म्हणाले..

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : राऊत जेवढ्या वाईट भाषेत बोलणार, तेवढी आमची ऐकी वाढणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी यावेळी बोलून दाखवला.

Sanjay Raut : 'गुवाहाटीतील बंडखोर जिवंत प्रेतं आहेत' राऊतांच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर, म्हणाले..
संजय राऊत, दीपक केसरकरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 8:40 AM

मुंबई : गुवाहाटीमधील बंडखोर आमदार हे जिवंत प्रेतं आहेत, त्यांच्या शरीरातील आत्मा कधीच मेलाय, अशी जळजळीत टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. दहिसरमधील शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानं बंडखोर आमदारांना (Rebel MLA Eknath Shinde News) संताप व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जर आम्ही प्रेतं असू, तर याच प्रेतांनी तुम्हाल राज्यसभेवर निवडून आणलं आहे, असंही ते म्हणालेत. त्यामुळे बेताल वक्तव्य करण्याआधी तुम्ही राज्यसभेची खासदारकी सोडा आणि पुन्हा निवडणूक येऊन दाखवा, असं म्हणत दीपक केसरकर यांनी राऊतांना उत्तर दिलंय. राऊत जेवढ्या वाईट भाषेत बोलणार, तेवढी आमची ऐकी वाढणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी यावेळी बोलून दाखवला.

शिवसेना पक्षावर दावा..

बंडखोर आमदार शिवसेना पक्षावर दावा करणार असल्याच्या प्रश्नावरही केसरकरांनी सविस्तर भूमिका मांडली. आम्ही ओरिजनल पार्टीचा दावा करत असल्याचं भासवलं जातंय. आणि त्यातून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जात आहेत, असा आरोप केसरकरांनी केलाय. आम्ही कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर आम्ही ज्या गोष्टी गरजेच्या असतील, त्यानुसार निर्णय घेऊ असंही ते म्हणालेत.

आज सुप्रीम सुनावणी

सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध करणार असल्याची माहितीही दिली. तसंच सुप्रीम कोर्टात आमचाच विजय होईल, कारण बहुमत आमच्याकडे आहे, असं त्यांनी म्हटलंय. चुकीचे सल्ले देणाऱ्यांमुळे शिवसेना अडचणीत आल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

पवारांवर हल्लाबोल

केसरकरांनी यावेळी पवारांच्या रणनितीवरही टीका केली. ‘इलेक्शन इज अ गेम ऑफ सायकोलॉजी… तो फॅक्टर वापरुन फूट पाडता येते का, हा त्यांचा प्रयत्न आहे’ असं म्हणत महाविकास आघाडीची रणनिती कळली असल्याचं केसरकरांनी म्हटलं आहे. तसंच पवार साहेबांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले असल्याचंही विधान त्यांनी केलं. त्याआधी बंडखोरांसोबत तडजोडी, सामंजस्याची भाषा उद्धव ठाकरे यांची होती, असंही ते म्हणालेत.

याचिकेतून शिंदे गटाचे ठाकरे गटावर कोणते आक्षेप?

  1. 16 बंडखोरांना पाठवलेली नोटीस अयोग्य असल्याचा आरोप
  2. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव असताना निलंबनाचा अधिकार नसल्याचा दावा
  3. नोटीसवर उत्तर देण्यासाठी 7 ऐवजी 2 दिवसांची मुदत देणं बेकायदेशीर असल्याचा आरोप
  4. अजय चौधरींची गटनेतेपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याची भूमिका
  5. दोन तृतीयांश सेना आमदार माझ्या बरोबर त्यामुळे मीच गटनेता आणि भरत गोगावले प्रतोद, शिंदेंचा दावा
  6. सुनिल प्रभूंना प्रतोद म्हणून व्हीप काढण्याचा अधिकार नसल्याचा दावा

वाचा एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतरच्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.