Eknath Shinde:काय झाडी, काय डोंगुर म्हणणाऱ्या आमदार शहाजीबापूंचा गुवाहाटीतून नवा व्हिडीओ.. म्हणाले..

आमदार शहाजी पाटील यांनी आपण आणि आपल्यासोबतच्या आमदारांनी बंडखोरी का केली असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे.

Eknath Shinde:काय झाडी, काय डोंगुर म्हणणाऱ्या आमदार शहाजीबापूंचा गुवाहाटीतून नवा व्हिडीओ.. म्हणाले..
हिंदुत्वाच्या विचारामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही आलोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 4:07 PM

मुंबई: महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) आणि शिवसेनेमधून बंडखोरी (Shivsena Rebel MLA) केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांचा मुंबई-सूरत आणि आता आसाममधील गुवाहाटतील दौऱ्यामुळे बंडखोर आमदार चर्चेत राहिले पण या सगळ्यांपेक्षा आणि ज्यांच्या ऑडिओमुळे सोशल मीडिया ढवळून निघाला त्या आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांचा आज दुसरा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

काय झाडी, काय डोंगुर…म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटील यांचा आता एक गंभीर असा व्हिडीओ समोर आला आहे.

…आता ऑडिओनंतर व्हिडीओ

यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी विकास निधी पासून ते अगदी शिवसेना, बंडखोरी आणि शिवसैनिकांना आवाहन असा सगळ्या गोष्टी त्यांनी या व्हिडीओमध्ये त्यांनी मांडले आहेत. हे सांगताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही ठपका ठेवला आहे.

 निधी जाणीवपूर्वक रोखला

सोलापूर जिल्हा सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा जो आजचा व्हिडीओ आला आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे. हे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले असले तरी याआधी कार्यकर्त्याबरोबर झालेल्या फोनवरही त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीबरोबरच नेत्यांवरही टीका केली आहे.

महाविकास आघाडीला कायम विरोध

मतदार संघातील विकास निधी अपुरा पाडत असल्यामुळे आणि त्याबाबत राजकारण होत असल्यामुळेच आपला पहिल्यापासून या महाविकास आघाडीला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांचा जो व्हिडीओ आला आहे त्यामध्येही त्यांनी विकासाच्या आड मविआ येत असल्यामुळेच महाविकास आघाडीला आमचा विरोध असल्याचे सांगितले.

हिंदुत्वाच्या विचारामुळे शिंदेंना साथ

आमदार शहाजी पाटील यांनी आपण आणि आपल्यासोबतच्या आमदारांनी बंडखोरी का केली असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपण कोणाच्याही संपर्कात नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावकडून वारंवार आपल्या संपर्कात काही आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. बंडखोर आमदारांना गुवाहाटीला जबरदस्तीने घेऊन गेले आहेत अशी टीका होत असतानाच आमदार शहाजी बापू पाटील यांनी मात्र एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही असंही ठामपणे सांगितले आहे.

शिवसैनिकांना आवाहन

याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये अशी विनंती आमदार शहाजी पाटील यांनी केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.