Shambhuraj Desai : मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवाल

Shambhuraj Desai : सत्ता गेली. निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे 40 आमदार हे शिंदेंच्या नेतृत्वात एकवटले आहेत. हे पाहिल्यावर तुम्ही राज्यात फिरत आहात. हे चांगलं लक्षण आहे. या निमित्ताने तुमचं दर्शन होतंय. सामान्य माणसांना भेटत आहात.

Shambhuraj Desai : मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवाल
मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 11:57 AM

सातारा: मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचं आवाहन आवाहन केलं जात आहे. सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी मैत्रीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तर, दुसरे बंडखोर आमदार शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनीही उद्धव ठाकरे यांना हेच आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंना सांगतो, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांचे विचार घेऊन युतीचे सरकार चालवत आहोत. त्याला मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा, आशीर्वाद देऊन सोबत पुढे यावे, असे आवहान शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी (aaditya thackeray) तुम्ही मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?, असा सवालच शंभुराज देसाई यांनी केला आहे.

हर घर तिरंगाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. आज नीती आयोगाची बैठक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जावं लागत आहे. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात भागतही मुख्यमंत्र्यांचे दौरे चालले आहेत. या दौऱ्यांवरही आदित्य ठाकरे यांनी कटाक्ष टाकावा. सरकारी कामकाजानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत. तेवढ्यावर टीका करू नका. आज तुमचं सरकार गेलं म्हणून तुम्ही राज्यात दौरे करत आहात. मंत्री असताना तुम्ही किती दौरे केले त्याकडे पहिलं लक्ष द्या, असा हल्लाबोल शंभुराज देसाई यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

सोयीस्कर टीका करू नका

सत्ता गेली. निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे 40 आमदार हे शिंदेंच्या नेतृत्वात एकवटले आहेत. हे पाहिल्यावर तुम्ही राज्यात फिरत आहात. हे चांगलं लक्षण आहे. या निमित्ताने तुमचं दर्शन होतंय. सामान्य माणसांना भेटत आहात. या निमित्ताने मातोश्रीची दारे सामान्य माणसाला उघडी झाली. त्यामुळे यावर आम्हाला काही म्हणायचे नाही. पण शिंदेंना ग्रामीण भागातील लोंढेच्या लोंढे भेटत आहेत. शिंदे हे गडचिरोली, नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत फिरत आहेत. त्याकडे लक्ष द्या. तिकडे लक्ष द्यायचे नाही आणि सोयीस्कररित्या दिल्ली दौऱ्यावरून टीका करायची हे चुकीचं आहे, अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

दंगली घडवण्याचा विषय जाणीवपूर्वक

शिवसेना भाजपच्या नैसर्गिक युतीचं हे सरकार आहे. हे सरकार आल्यापासून ज्यांना हे रूचले नाही, पचले नाही, जे स्वीकारायाल तयार नाहीत, ते लोक पहिल्या दिवसापासून युती सरकारवर टीका करत आहेत. दंगली घडवण्याचा विषय त्यांच्याकडून जाणीवपूर्वक केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हल्ला करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन

उदय सामंत यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलं आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत. त्यांच्या हातात शिवबंधन होतं. दोन पक्ष आणि विचारात भांडणं लावून महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आहेत. ते चुकीचं आहे. कुणाचा दंगली घडवण्याचा कुणाचा मानस असेल तर शिंदे- फडणवीस त्याची गंभीर दखल घेतील, असंही ते म्हणाले.

आमदार, खासदारांनी तुमचं नेतृत्व का सोडलं?

आम्हाला आदित्य ठाकरे यांनी गद्दार म्हणण्याआधी तुमचे आमदार आणि खासदार तुमच्या नेतृत्वापासून दूर का गेले? हे पहावे. त्यामुळे आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून शिवसेना वाचविण्याचे काम केले आहे. आदित्य ठाकरे हे नव्यानेच राजकारणात आलेले आहेत. ज्या काळात शिवसेना हे नाव उचारल्यास कारवाई होत होती. अशा काळात आम्ही शिवसेना उभी केली, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.