Breaking News: बंडखोरांसाठी केंद्र सरसावलं, 15 बंडखोर आमदारांच्या कुटूंबियांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय, आता ठाकरे विरुद्ध मोदी?

राज्यात बंडखोरांविरुद्ध शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अगोदरचा समोपचार आणि समजुतीचा सुर जाऊन आता तीव्र शाब्दिक हल्ले आणि बंडोबांच्या कार्यालयावर हल्ले चढवण्यात येत आहे. त्यामुळे गुवाहाटीतील आमदार धास्तावले आहेत.त्यामुळे 15 बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्र ही सरसावलं आहे. त्यांनी या आमदारांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे.

Breaking News: बंडखोरांसाठी केंद्र सरसावलं, 15 बंडखोर आमदारांच्या कुटूंबियांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय, आता ठाकरे विरुद्ध मोदी?
बंडखोरांना केंद्राचं संरक्षणImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 2:38 PM

महाराष्ट्रातील महा राजकीय नाट्याचे (Maharashtra Political Crises) पडसाद राज्यभर उमटत आहे. आता या नाट्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार (State Vs Central Government) असा ही सामना लवकरच रंगण्याची चिन्हे आहेत.बंडखोरांविरुद्ध शिवसेनेने तीव्र शाब्दिक हल्ले चढवले आहेत. त्याचे पडसाद या आमदारांच्या कार्यालयावरील हल्ल्यातून दिसून येत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी बंडखोरांच्या निषेधार्थ आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोरांनी (Rebel MLA) ही परतीचे दोर कापल्याने आता मुद्यावरुन ही लढाई थेट गुद्यावर आली आहे. राज्यातील ही बंडाळी मोडण्यासाठी शिवसैनिक कायदा हातात घेतली अशी एकंदरीत घटना आणि घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे गुवाहाटी (Guwahati) येथे असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार ही धास्तावले आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावले आहे. त्यांनी तातडीने या 15 बंडोबांना वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. त्यामुळे आता या स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या आमदारांना तगडी सुरक्षा प्रदान केली आहे. त्यांनी या 15 आमदारांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे.

काय आहे वाय प्लस सुरक्षा

व्हीआयपी अथवा प्रतिष्ठित लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार सुरक्षा यंत्रणा तैनात करते. यंत्रणेच्या माध्यमातून त्या व्यक्तिंना सुरक्षा देण्यात येते. धोक्याची तीव्रता लक्ष्यात घेऊन राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महानिर्देशक यांची गठित समिती कोणाला कोणत्या श्रेणीची सुरक्षा द्यावी याचा निर्णय घेतो. वाय (Y) ही तिस-या श्रेणीतील सुरक्षा श्रेणी आहे. Y+ श्रेणीत 2-4 कमांडो आणि पोलिस कर्मचार्‍यांसह 39 कर्मचार्‍यांचा समावेश असतो. तर केवळ Y श्रेणीमध्ये 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्‍यांसह 28 कर्मचार्‍यांचा समावेश असतो. या कर्मचा-यांकडे अत्याधुनिक हत्यार आणि शस्त्र असतात. अचानक झालेल्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी ही तुकडी सक्षम असते. एका सुरक्षा रक्षकाकडे 9 एमएमची पिस्तुल तर एकाकडे स्टेन गन असते. व्यक्तीला दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी ही देण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत हे आमदार

रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय सिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरवणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भूसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर, संदिपान भुमरे या 15 आमदारांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या आमदारांच्या घरासमोर ही तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर सुरक्षेसाठी बॅरिकेट्स ही लावण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.