Eknath Shinde : जागते रहो..! बंडखोर शिवसेना आमदारांना आसामच्या मंत्र्यांचाही पहारा
राज्यातील राजकीय घडामोडीचे केंद्रबिंदू हे गुवाहटीमधील रेडीसन ब्लू हे हॅाटेल आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हॉटेल चर्चेत आले असून हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना आसाम सरकारमधील दोन मंत्री हे पहारा देत आहेत. दिवसा मंत्री अशोक सिंगल यांचा पहारा तर रात्री मंत्री पयुश हजारीका हे आपली ड्युटी निभावत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Guwahati) गुवाहटी येथील शिवसेनेच्या बंडखोर आमदार हे तेथील पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये होते. संबंध (Radisson Blu) रेडीसन ब्लू हॅाटेलला अक्षरश: छावणीचे स्वरुप आले असल्याचे पाहवयास मिळत असताना आता वेगळीच बातमी समोर येत आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या आमदारांना केवळ पोलिसांचाच बंदोबस्त आहे असे नाही तर आसामचे (Two ministers) दोन मंत्रीही जागता पहारा देत आहे. एवढेच नाही दिवसभर एकजण आणि रात्री दुसऱ्याची ड्युटी अशी हॉटेलमधील स्थिती आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांवर केवळ गट प्रमुख एकनाथ शिंदे यांचेच लक्ष नाहीतर इतर दोन मंत्रीही ठाण मांडून आहेत.
हे दोन मंत्री रेडीसन ब्लू हॅाटेलमध्ये ठाण मांडून
राज्यातील राजकीय घडामोडीचे केंद्रबिंदू हे गुवाहटीमधील रेडीसन ब्लू हे हॅाटेल आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हॉटेल चर्चेत आले असून हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना आसाम सरकारमधील दोन मंत्री हे पहारा देत आहेत. दिवसा मंत्री अशोक सिंगल यांचा पहारा तर रात्री मंत्री पयुश हजारीका हे आपली ड्युटी निभावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ते ही बंडखोर आमदारांना किती महत्व आले आहे याचा प्रत्यय येतोय. दिवसेंदिवस शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत असली तरी अशाप्रकारे कडेकोट बंदोबस्त याची चर्चा आता राज्यात होऊ लागली आहे.
बंदोबस्ताचे नेमके कारण काय ?
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे सध्या राजकीय हायहोल्टेज रंगला आहे. शिवाय या आमदारांच्या भूमिकेवरच राज्यातील सरकार ठरणार आहे. त्यामुळे आसाम सरकारही किती सतर्क आहे याचा प्रत्यय येतोय. आसाममध्ये भाजपाचे सरकार आहे म्हणजेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी भाजपाच्या मंत्र्यांना द्यावा लागतोय पहारा अशी स्थिती निर्माण झालीय.
सर्व बंडखोर आमदार एकाच हॉटेलमध्ये
सुरतहून गुवाहटीला आलेले शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार हे रेडीसन ब्लू हॅाटेलमध्ये थांबलेले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या बंडखोर आमदारांना या ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलमध्ये एन्ट्री तर आहे पण एक्झिट मात्र परवानगीनेच असेच म्हणावे लागेल. आता पोलिसांबरोबर मंत्र्यांनाही पहारा द्यावा लागत आहे. जोपर्यंत हे राजकीय नाट्य संपत नाही तोपर्यंत आसामच्या मंत्र्यांना काय-काय करावे लागेल हे तर आता सांगता येणार नाही.