नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक

स्थानिक नोकर भरतीत स्थानिकांना डावलंल जात असून त्यांना सर्वप्रथम प्राधान्य द्या असे पावित्रा घेत मनसे आक्रमक झाली आहे. या आंदोलनादरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक
Follow us
| Updated on: Aug 25, 2019 | 2:18 PM

पालघर : पालघरमधील (Palghar) डहाणू आदिवासी विकास प्रकल्पात संगणक शिक्षकांच्या आयोजित केलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मनसेने(MNS) आंदोलन केले. स्थानिक नोकर भरतीत स्थानिकांना डावलंल जात असून त्यांना सर्वप्रथम प्राधान्य द्या असे पावित्रा घेत मनसे आक्रमक झाली आहे. या आंदोलनादरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत आश्रम शाळेत गेल्या 8 वर्षांपासून अनुसूचित जमातीतील 27 सुशिक्षित तरुण कंत्राटी पद्धतीने संगणक शिक्षक/निदेशक या पदावर कार्यरत होते. पण शासन निर्णयातील जाचक अटीमुळे मात्र हे तरुण आठ महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत. त्यांचे भविष्य अंधकारमय बनले होते. त्यामुळे या बेरोजगार तरुणांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांची भेट घेतली होती.

दरम्यान एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत 57 संगणक शिक्षक भरतीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ही परीक्षा होणार होती. ही परीक्षा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरील तरुण उपस्थित होते

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असताना देखील येथील तरुणांना डावललं जात आहे. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी आक्रमक पावित्रा घेत महाविद्यालयाच्या गेटबाहेर विद्यार्थ्यांना मनसेने अडवले. तसेच यावेळी मनसेकडून परीक्षा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.