Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप

मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. | Sanjay Rathod

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप
संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 10:55 AM

मुंबई :  राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Sanjay Rathod Resign) सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे, अशी माहिती कळतीय. यानंतर भाजप आक्रमक झालं आहे. आता राजीनाम्यानंतर मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. (Register A Case Against maharashtra Minister Sanjay Rathod Demand BJP)

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे यांनी मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर टीव्ही 9 मराठीशी बोलताना भाजप नेत्यांनी तशी मागणी केली आहे.

जोपर्यंत राजीनामा देत नव्हते तोपर्यंत सखोल आणि निष्पक्षपातीपणे चौकशी होणार नव्हती. मात्र आता राठोड यांनी आता राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारावा, प्रकरणाच्या तळाशी जावं आणि सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी केलीय?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सर्वप्रथम वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. तसंच तरुणीच्या आत्महत्येला संजय राठोड हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतर भाजप नेते गिरीश व्यास, अतुल भातखळकर, निलेश राणे यांनीही राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार का?

राठोड यांनी आपला राजीनामा ‘मातोश्री’वर पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide case) संजय राठोड यांचं नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवला. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का, भाजपच्या मागणीनुसार राठोडांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

पूजाला न्याय मिळणार?

दरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा तर घेतला आहे. मात्र आता संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण ना राजीनाम्याने, ना संजय राठोड यांना शिक्षा केल्याने, पूजा परत येऊ शकेल. मात्र कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे जर पुन्हा एकदा सिद्ध करायचं असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधक करत आहेत.

(Register A Case Against maharashtra Minister Sanjay Rathod Demand BJP)

हे ही वाचा :

मोठी बातमी: अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.