Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : सरपंच आरक्षणाची सोडत कधी?, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात….

एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : सरपंच आरक्षणाची सोडत कधी?, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात....
हसन
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 4:11 PM

कोल्हापूर :  राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. यानंतर आता पॅनेल प्रमुखांपासून ते सदस्यांपर्यंत सगळ्यांनाच सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (Reservation of Sarpanch post within 1 month after election result Says minister hasan Mushriff)

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. बाकीच्या ग्रामपंचायतीचेही निकाल लागले आहेत. कुठे अनपेक्षित निकाल आहेत तर कुठे अनेकांची अनेक वर्षांची सत्ता गेलीय. कुठे सासू-सूनांमध्ये काँटे की टक्कर झालीये तर कुठे जावा-जावांमध्ये शर्यत पाहायला मिळाली.

निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढली काढण्याचा निर्णय घेतला.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या सोडतीवर सविस्तर भाष्य केलं. तसंच राजकीय फटकेबाजीही केली.  नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे, असं म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात भाजपची धुळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारलं आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येतोय. तसंच संबंध राज्यभर चंद्रकांत पाटलांच्या गावात त्यांना सत्ता राखता आली नसल्याची चर्चा होतीय. याचाच संदर्भ घेत “उद्या भाजपचेच नेते म्हणतील दादा तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही”, अशी कोपरखळी मुश्रीफांनी मारली.

चंद्रकांतदादांच्या खानापुरात शिवसेनेनं बाजी मारली. तसंच भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांच्या गावात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर राज्याच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर हे लक्षात येईल की महाविकास आघाडीची सरशी झाली आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

(Reservation of Sarpanch post within 1 month after election result Says minister hasan Mushriff)

हे ही वाचा

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | हर्षवर्धन जाधवांच्या मुलाची आईविरुद्ध लढत, औरंगाबादच्या लढतीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेना-भाजपला जोरदार टक्कर, मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर झेंडा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्याची सत्ता कुणाच्या हाती?; ठाकरे, पवार, चव्हाण, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.