काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात
आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat on unhappy congress MLA)
मुंबई : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह 11 आमदार नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरुन नाराज आहेत. यासंदर्भात “आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. “आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat on unhappy congress MLA)
“काही आमदारांमध्ये नाराजी आहे. ती आम्ही बोलून घालवू. काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे. तर काहींना कमी मिळाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र मी त्या पक्षाचं नाव घेणार नाही,” असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.
“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु. आम्ही सर्व नेते मुख्यमंत्र्यांशी बोललो, असे थोरात म्हणाले.
“आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असेही बाळासाहेब थोरातांनी सांगितले.
हेही वाचा – काँग्रेसच्या नाराज आमदाराची अजित पवारांकडून समजूत, गोरंट्याल म्हणतात “दादा, तुमच्यावर पूर्ण भरोसा”
जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली.
अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर “दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल यांनी सांगितले. (Balasaheb Thorat on unhappy congress MLA)
गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड, गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीपेक्षा राहुल गांधी यांनीच नेतृत्व करावे : संजय राऊत https://t.co/huZuuqQTKu @rautsanjay61 #RahulGandhi
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2020
संबंधित बातम्या :
काँग्रेसचे तब्बल 11 आमदार उपोषणाच्या तयारीत, ठाकरे सरकारवर जाहीर नाराजी
‘निधी वाटपावरुन काँग्रेसचे 11 नाराज आमदार उपोषणाच्या तयारीत’, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…