आठवीच्या विद्यार्थीनीचं रोहित पवारांना भावनिक पत्र, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर…

मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघातील ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची (Student) शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व त्यांचा वेळ वाचावा या उद्देशाने बारामती ऍग्रो आणि केजेआयडीएफच्या माध्यमातून शालेय सायकल बँक करण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते आदरणीय अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते काल १० हजार सायकलचे वितरण करण्यात […]

आठवीच्या विद्यार्थीनीचं रोहित पवारांना भावनिक पत्र, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर...
rohit pawar letterImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 11:18 AM

मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघातील ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची (Student) शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व त्यांचा वेळ वाचावा या उद्देशाने बारामती ऍग्रो आणि केजेआयडीएफच्या माध्यमातून शालेय सायकल बँक करण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते आदरणीय अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते काल १० हजार सायकलचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून १० हजार शालेय विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. सुरुवातीला ३ किमीपेक्षा अधिक अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सायकल देण्यात येत असून येत्या काळात आणखी विद्यार्थ्यांनाही सायकल देण्यात येणार असल्याचे कार्यक्रमादरम्यान रोहित पवारांनी सांगितले.

रोहित पवारांनी सायकलचं वाटप केल्यापासून त्यांची अधिक चर्चा सुरु आहे. त्यांच्या मतदारसंघातील शाळेचे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी सायकल मिळाल्यामुळे अधिक खूष आहेत. कर्जत जामखेडमधील विद्यार्थ्यांसह पालक सुध्दा अधिक खूष आहेत. विद्यार्थ्यांना आता शाळेत जात असताना कसल्याची प्रकारची अडचण येणार नाही अशी पालकांमध्ये चर्चा सुरु आहे.

सायकल मिळाल्यानंतर तृप्ती नावाच्या मुलीने रोहित पवारांना एक चिठ्ठी लिहून दिली आहे. त्यामध्ये रोहित पवारांचं तिने कौतुक सुध्दा केलं आहे. ही चिठ्ठी रोहित पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल सुध्दा केली आहे.

हे सुद्धा वाचा
TRUPTI LETTER

पत्र

तृप्तीनं काय लिहीलंय चिठ्ठीत…

“सुरुवातीला तुमचे आमच्या सारख्या अनेक चिमुकल्यांना सायकली दिल्याबद्दल कर्जत – जामखेडच्या सर्व लहान मुलांकडून तुमचे मी तृप्जी खुप खुप अभिनंदन करते. आणि तुम्ही आम्हाला सायकल दिल्यामुळे आम्ही लहान मुलांना खुप आनंद झाला. आम्हाला तुम्ही आमच्या भविष्यासाठी एक दूत आहात याची खात्री आम्हाला पटू लागली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करताना दिसत आहात. आम्हाला पडलेले स्वप्न तुम्ही पूर्ण करताना दिसत आहात.”

“या कर्जत-जामखेड मध्ये भव्य मेडिकल कॉलेज उभे राहावे अशी आमची इच्छा आहे व ती इच्छा तुम्ही पूर्ण करणार अशी आम्हाला खात्री आहे. दादा, तुम्ही या आमच्या कर्जत-जामखेडच्या विकासासाठी खूप प्रयत्न करतात हे पाहून आम्हा लहान मुलांना खूप आनंद वाटतोय. दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा”अशी चिठ्ठी तृप्ती संतोष थेठे या विद्यार्थीनीने लिहिली आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.