Rohit Pawar : लोकसभेसाठी भाजपचं ‘मिशन 45’, बारामतीची जबाबदारी राम शिंदेंकडे; आता रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना प्रतिआव्हान

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रतिआव्हान दिलंय. राम शिंदे यांना विधान परिषद दिली आहे त्यांना तिकडेच राहू द्या. 2024 ला माझ्या विरोधात विधानसभा द्या, बघा लोक काय करतात, असा इशाराच रोहित पवार यांनी दिलाय.

Rohit Pawar : लोकसभेसाठी भाजपचं 'मिशन 45', बारामतीची जबाबदारी राम शिंदेंकडे; आता रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना प्रतिआव्हान
रोहित पवार, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:06 PM

पुणे : राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आता विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु झालीय. अशावेळी भाजपनं मिशन 45 सुरु केल्याचंही पाहायला मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपनं 2019 मध्ये निवडून न येऊ शकलेल्या 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीय केलंय. त्यात भाजपचं पहिलं लक्ष आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर. भाजपकडून बारामतीची जबाबदारी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रतिआव्हान दिलंय. राम शिंदे यांना विधान परिषद दिली आहे त्यांना तिकडेच राहू द्या. 2024 ला माझ्या विरोधात विधानसभा द्या, बघा लोक काय करतात, असा इशाराच रोहित पवार यांनी दिलाय.

विधान परिषद निवडणुकीवरुन भाजपला आव्हान

रोहित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीवरुनही भाजपवर निशाणा साधलाय. भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे, मुंडे यांना संधी दिली नाही. आता ते त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतील. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणू, असा दावाही रोहित पवार यांनी केलाय. देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर अजित पवार यांना बोलू दिलं गेलं नाही, असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातोय. त्यावरुनही रोहित पवारांनी फडणवीसांना उपरोधिक टोला हाणलाय. देहूत राजकारण करायला नको होतं, असं रोहित पवार म्हणाले.

भाजपचं ‘मिशन 45’ काय?

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन 45 राबवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आज महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर बोलताना फडणवीस यांनी भाजपच्या मिशनबाबत माहिती दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं 16 आणि अजून 8 लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष असणार आहे. त्यात प्रामुख्याने बारामती, औरंगाबाद, बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, पालघर, दक्षिण मुंबई, रायगड, शिरुर, सातारा, शिर्डी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकनंगले, उस्मानाबाद या मतदारसंघांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.