मिसळीवर ताव मारल्यानंतर रोहित पवारांच्या पुरणपोळ्यांवरुन फडणवीसांना, तर बिलावरुन भाजप नेत्यांना जोरदार टोला!

रोहित पवार यांनी आज कर्जत-जामखेडय्या दौऱ्यावर असताना माही जळगावातील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळीवर ताव मारला. त्याचे फोटो ट्विटरवर शेअर करत रोहित पवार यांनी 'एकाच मिसळीत पोट भरल्यानं 35 मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनंच कसंतरी झालं..', अशा शब्दात फडणवीसांना टोला लगावला आहे.

मिसळीवर ताव मारल्यानंतर रोहित पवारांच्या पुरणपोळ्यांवरुन फडणवीसांना, तर बिलावरुन भाजप नेत्यांना जोरदार टोला!
आमदार रोहित पवार यांचा मिसळीवर ताव
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:40 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकत्याच झी मराठीवरील किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. रोहित पवार यांनी आज कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर असताना माही जळगावातील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळीवर ताव मारला. त्याचे फोटो ट्विटरवर शेअर करत रोहित पवार यांनी ‘एकाच मिसळीत पोट भरल्यानं 35 मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनंच कसंतरी झालं..’, अशा शब्दात फडणवीसांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांनी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वडापाव खाल्ला, मात्र बिल न देताच नेते निघून गेल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यावरही रोहित पवार यांनी मिश्किल टीका केलीय.

‘मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं… आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं’, असं खोचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या होत्या?

अमृता फडणवीस या झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमात त्या झळकणार आहेत. देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यावेळी पत्नी सुगरण आहे की आई, असा कोड्यात टाकणारा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यामुळे भल्याभल्यांची फिरकी घेणारे फडणवीसही बुचकळ्यात पडले. एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिलं.

इतर बातम्या : 

गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब, बाळ, वारसं दुसऱ्याचं आणि डफडं तुमचं-खडसे

मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला, तर राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची टीका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.