महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान; रोहित पवारांची स्तुतिसुमनं

महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान आहे, असेही रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं. (Rohit Pawar FB Post On Sharad Pawar Women Empowerment)

महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान; रोहित पवारांची स्तुतिसुमनं
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 9:04 AM

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 80 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक निर्णय घेतले. महिलांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकतात, यावर साहेबांचा पहिल्यापासून विश्वास आहे. त्यामुळे  राज्यातील स्त्रियांसाठी पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला,” अशी पोस्ट शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी लिहिली. (Rohit Pawar FB Post On Sharad Pawar Women Empowerment)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी केली होती. शरद पवारांनी नुकतंच 81 वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने रोहित पवारांनी फेसबुकवर पोस्ट टाकत शरद पवार आणि महिला सक्षमीकरण याबाबत लिहिले. महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान आहे, असेही रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं.

महिला सक्षमीकरणासाठी आरक्षणाची तरतूद!

“आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या ८० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहीलच पण सामाजिक जडणघडणीत हे निर्णय एक मैलाचा दगड ठरतील, असा मला विश्वास आहे.

स्त्री सशक्तीकरण हा फक्त बोलण्याचा शब्द नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याची किमया कुणी केली असेल तर ती पवार साहेबांनी. महिलांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकतात, यावर साहेबांचा पहिल्यापासून विश्वास आहे आणि या विश्वासाच्या बळावरच त्यांनी महिलांना राजकारण, समाजकारणात बरोबरीने संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1993 साली पवार साहेबांनी देशात पहिल्यांदा राज्यात महिला धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. निर्णयप्रक्रियेत त्यांना सामावून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद केली गेली, आज ती 50% पर्यंत वाढलीय.

महिला आणि बालविकासासाठी जिल्हा परिषद पातळीवर वैधानिक समिती निर्माण करुन या समितीचं अध्यक्षपद महिलांकडेच राहील याची काळजी घेतली. या धोरणामुळं समाजात अनेकांना धक्के बसणार होते, पण त्यामुळं काही नुकसान होणार नाही यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती केली. महिला आणि बालकल्याण हे खाते वेगवेगळे केले. महिला कल्याण सक्षमीकरणाची संकल्पना घेऊन सुरू झालेला हा विचार पवार साहेबांच्या प्रयत्नांमुळे महिला विकासाला चालना देणारा ठरला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला भगिनी मोठ्या हिमतीने गावगाड्यापासून शहरापर्यंतचा कारभार हाकतात. त्यामुळं राज्यातील स्त्रियांसाठी पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला, असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही..!,” अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

(Rohit Pawar FB Post On Sharad Pawar Women Empowerment)

संबंधित बातम्या :

Sharad Pawar Birthday | 81 पावसाळे पाहिलेला योद्धा; शरद पवारांच्या 81 गोष्टींचा खास आढावा

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.