Rohit Pawar : आजचा गोंधळ पाहून राजकारण सोडण्यासारखी स्थिती, रोहित पवारांना का आठवलं गडकरींचं वाक्य? पुढे म्हणतात..

ही कारवाई सोडापोटी आहे असा सूर विकास आघाडीतील नेत्यांनी लावला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तर राज्यभर आंदोलनही केली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठं विधान केलंय.

Rohit Pawar : आजचा गोंधळ पाहून राजकारण सोडण्यासारखी स्थिती, रोहित पवारांना का आठवलं गडकरींचं वाक्य? पुढे म्हणतात..
आजचा गोंधळ पाहून राजकारण सोडण्यासारखी स्थिती, रोहित पवारांना का आठवलं गडकरींचं वाक्य? पुढे म्हणतात..Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 11:20 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणातला आजचा दिवस म्हणजे सकाळपासूनच चौकशींचा, धाडींचा आणि गोंधळाचा ठरला आहे. रविवार म्हणजे अनेकांना सुट्टीचा दिवस वाटतो. मात्र या रविवारी ही ईडीने संजय राऊत यांना काय सुट्टी दिली नाही. तब्बल नऊ तास संजय राऊतांवरती (Sanjay Raut) धाडसत्र चाललं. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेऊन कार्यालयात गेले(Sanjay Raut ED Enquiry). यावर दिवसभर दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. संजय राऊत यांना जेलमध्ये जाण्यासाठी उशीर झालाय, असा सूर भाजप नेते लावत होते. तर ही कारवाई सोडापोटी आहे असा सूर विकास आघाडीतील नेत्यांनी लावला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तर राज्यभर आंदोलनही केली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक मोठं विधान केलंय.

रोहित पवारांना गडकरी आठवले

आजची स्थिती पाहून राजकारण सोडावं असं वाटतंय, असे रोहित पवार म्हणाले. तसेच त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बोलले एक वाक्यही आठवले, त्याचाच दाखला त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलाय, याबाबत रोहित पवार ट्विट करत म्हणतात, आज दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी मा. गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं! असे ट्विट रोहित पवार यांच्याकडून करण्यात आले.

रोहीत पवार यांचं ट्विट

एकेकडून भाजप म्हणते ही कारवाई पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत राहून आहे. केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये भाजपचा कोणताही हस्तक्षेप नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते हे विरोधकांना नामोहरम करण्याचं षडयंत्र असल्याची टीका करतात. आता संजय राऊत यांचे हे प्रकरण कुठपर्यंत अडकत जाणार? आणि नवाब मलिकाने आणि देशमुख यांच्यासारखं संजय राऊतांनाही यांनाही तुरुंगात राहावा लागणार का? हेही पाहण्यात तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित पवारांचं हे ट्विट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सकाळपासून भाजपवर होणारी टीकाही तितकीच चर्चेत राहिली आहे. पुन्हा यावरून वाद सुरू झालाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.