लोकल सुरु करण्याच्या वादात रोहित पवारांची उडी, पियुष गोयल यांना मध्यरात्रीच्या ‘त्या’ ट्विटचा दाखला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना टोला लगावला आहे. (MLA Rohit Pawar reminds Railway Minister Piyush Goyal pending decision of Mumbai local train service resume to public)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना टोला लगावला. तर, भाजपचं नाव न घेता टीका केली आहे. “श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही,असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (MLA Rohit Pawar reminds Railway Minister Piyush Goyal pending decision of Mumbai local train service resume to public)
श्रमिकरेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही,असं tweet मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत,याचं आश्चर्य वाटतं.तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात. pic.twitter.com/0m5HivRUTA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 1, 2020
रोहित पवार यांनी लोकल सुरु करण्यासंदर्भात पियुष गोयल यांना श्रमिक रेल्वेबाबत त्यांनी केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली. यासोबतच त्यांनी राज्यातील भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. “स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात”, अशी टीका केली आहे.
राज्य सरकारचे रेल्वेला पत्र आणि रेल्वेचे उत्तर
सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती.
लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिवाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्राला देत रेड सिग्नल दाखवला आहे.
दिवसभरात 3 टप्प्यांत प्रवासाची परवानगी देण्याची सरकारकडून विचारणा
सकाळी 7.30 पासून सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती सकाळी 8 ते साडेदहा पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती संध्याकाळी 5 ते 7.30 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रात्री 8 ते शेवटच्या लोकलपर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती महिलांसाठी दर तासाला एक लोकल देण्याची विनंती
सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल का? रेल्वेचा प्रश्न
सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू केल्यास रेल्वे फ्लॅटफार्मवरील होणारी गर्दी घातक ठरेल, असं रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करायचे. सर्व लाइनवर एकूण 80 लाख प्रवासी प्रवास करायचे. यातील 50 टक्के प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल का? हा मोठा प्रश्न असल्याचा सवालही या पत्रातून करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?
लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा
(MLA Rohit Pawar reminds Railway Minister Piyush Goyal pending decision of Mumbai local train service resume to public)