Video: ‘होय, शरद पवार साहेब खोटं बोलले’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?

Rohit Pawar on Sharad Pawar: शरद पवार खोटं बोललं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याला ट्वीटच्या माध्यमातून रोहित पवारांनी उत्तर दिलंय.

Video: 'होय, शरद पवार साहेब खोटं बोलले' व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?
शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:10 PM

मुंबई : राष्ट्रवादी आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार खोटं बोलले, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याला ट्वीटच्या माध्यमातून रोहित पवारांनी उत्तर दिलंय. इतकंच काय, तर शरद पवार खोटं बोलले, हे मान्यही केलंय. मात्र हे मान्य केल्यानंतर त्यांनी नेमकं असं का केलं, याचं कारणही सांगितलंय. शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन (Babasaheb Purandare & James Lane) या सगळ्याभोवतीचा वाद पुन्हा चर्चेत आलाय. शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत या सगळ्या वादावर पहिल्यांदाच रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली. एकूणच हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत शरद पवारांवर टीका करताना इतिहासावरुन वक्तव्य केलं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यांना शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेत जळगावात उत्तर दिलं होतं. त्यानंतर भाजप आमदारांनीही पवारांना जोरदार टीका केली. त्या सगळ्या टीकेला आता रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत पलटवार केलाय.

व्हिडीओमध्ये काय आहे?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासोबत एका मुलाखतीदरम्यान, बातचीत करताना शरद पवारांनी 1993 साली झालेल्या बॉम्पस्फोटाविषयी सांगितलंय. एकूण 6 मिनिटं 33 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये शरद पवारांनी या बॉम्बस्फोटाचं नेमकं कारण काय होतं, हे सांगितलंय. हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतून बॉम्बहल्ला झाल्याचा संशय तेव्हा आल्याचं पवारांनी म्हटलंय. म्हणून शरद पवारांनी यावेळी 11 ऐवजी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, असं सांगितलंय. आणि यातलं बारावं ठिकाण हे मश्जिद बंदर होतं, असाही खुलासा शरद पवारांनी यावेळी मुलाखतीमध्ये दिला.

हल्ला करणाऱ्यांना धर्माच्या दंगली घडवायच्या होत्या. मात्र एकाच धर्माच्या केंद्रस्थानी हल्ले झालेले आहेत, असा संदेश जाऊ नये, म्हणून मी त्यावेळी खोटं बोललो होतो, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना मुंबई कुठेही घाबरलेली नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी 22-22 तास यंत्रणा राबली होती. मुंबईच्या लोकांमुळे हे सगळं सुरु झालं, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलंय.

पाहा रोहित पवारांनी शेअर केलेला व्हिडीओ :

…म्हणून शरद पवारांवर टीका!

राज ठाकरेंनी केलेल्या उत्तरसभेतील टीकेवर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी जेम्स लेन प्रकरणावरुन शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा माफीनामाच वाचून दाखवलेला. तर दुसरीकडे जेम्स लेननं दिलेल्या स्पष्टीकरणात आपण कधीच बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो किंवा बोललो नसल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता सर्व विरोधकांनी शरद पवारांवर टीका निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.

वाचा रोहित पवार यांचं ट्वीट :

सत्ता गेल्यानं विरोधकांची तडफड?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.