मुंबई : “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. “भाजपमधील मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं” अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. (Rohit Pawar taunts Chandrakant Patil over comment on Shivsena BJP Reunion)
“आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता पाच वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!” असे ट्वीट रोहित पवारांनी केले आहे.
आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!
आतातरी राजकारण थांबवा!— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2020
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
“राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली. शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले.
फडणवीसांची सारवासारव
“शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही” असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप आता स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल, असेही ते म्हणाले.
अशोक चव्हाणांची टीका
“आमची उद्धव ठाकरेंशी वेळोवेळी चर्चा झाली आहे. खाजगी बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी आपण भाजपबरोबर जाण्याच्या मनस्थिती नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशी सूतराम शक्यता नाही” असे चव्हाण म्हणाले. “विरोधकांना स्वप्न पडत आहेत, आज त्यांचं सरकार येईल, उद्या त्यांचं सरकार येईल, ते आपल्या लोकांना झुलवण्याचा प्रयत्न करत आहेत” असा टोलाही अशोक चव्हाणांनी लगावला.
सामनातून घणाघात
“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जेपी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये” असा इशारा सामनाच्या अग्रलेखात दिला आहे.
संबंधित बातमी :
शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील
“भाजपची मगरमिठी स्वीकारली, तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका” सामनातून इशारा
(Rohit Pawar taunts Chandrakant Patil over comment on Shivsena BJP Reunion)