अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही : रोहित पवार

अशोक चव्हाण यांच्या महाविकास आघाडी विषयीच्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. त्यामुळे विचारानेच बांधले गेलो आहोत

अशोक चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही : रोहित पवार
Follow us
| Updated on: Jan 28, 2020 | 12:04 AM

अकोला : “अशोक चव्हाण यांच्या महाविकास आघाडी विषयीच्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. त्यामुळे विचारानेच बांधले गेलो आहोत”, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले (Rohit Pawar). अकोला शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Rohit Pawar).

नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत एक भाष्य केलं. “काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीला विरोध केला होता. मात्र, आम्ही सोनिया गांधी यांना आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले”, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला होता (Ashok Chavan Statement). त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. विरोधकांनीही यावर अनेक टीका केल्या. मात्र, रोहित पवार यांनी हे प्रकरण सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला (Ashok Chavan Statement).

याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, “असे कुणी लिहून घेत नसते. अशोक चव्हाण सहज बोलले असतील. हे सरकार पाच वर्षे टिकावं, अशी शिवसेनेसह सर्वांची इच्छा आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल”, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

संविधानाच्या चोकटीत सरकार चालवलं तर बरं, अन्यथा सरकारमधून बाहेर पडा : अशोक चव्हाण

“आमचं राजकीय क्षेत्र सिनेमा, नाट्य क्षेत्रापेक्षा काही वेगळं नाही. आमचा ही सिनेमा सध्या चांगला चालला आहे”, असं वक्तव्य नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी 26 जानेवारीच्या कार्यक्रमात केलं. तसेच, “मल्टिस्टारचा म्हणजेच तीन-तीन हिरोंचा सिनेमा येत आहे. तसेच, आमचं चालू आहे. पूर्वी मी दोन पक्षाचं सरकार चालवलं, आता तीन पक्षाचं सरकार सुरू आहे. आम्ही लिहून घेतले आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं, पहिले हे लिहून घ्या, संविधानाच्या चौकटीत सरकार चालवलं तर बरं, अन्यथा सरकारमधून बाहेर पडा”, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं.

अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिला. “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत होती तेव्हा वेळ लागणार होता. त्यावेळेस तुम्ही सगळे तक्रार करत होते. तसेच, लोकशाही मार्गाने सर्व काही झालं पाहिजे असं मत होतं, हे शिवसेनेनं मान्य केलं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.