…तर महाराष्ट्राची पंरंपरा जपल्या गेली असती, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

...तर महाराष्ट्राची पंरंपरा जपल्या गेली असती, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
रोहित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 1:59 PM

पुणे :  गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे, भाजपाकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकारण रंगलं तर नंतर ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आज अंधेरी विधासभा निवडणुकीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या निवडणुकीतून माघात घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हटलं रोहित पवार यांनी

रोहीत पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुकीवरून भाजपाला टोला लगावला आहे. आता अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र दिसतंय. पण त्याआधी जे घडलं ते निंदनीय आहे. त्यांनी आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध करतोय असं जाहीर केलं असतं तर महाराष्ट्राची परंपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

ग्रामपंचयात निकालावर प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी बोलताना रोहित पवार यांनी आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीला यश मिळत आहे. हे सध्याच्या चित्रावरून दिसतंय. संध्याकाळपर्यंत हेच चित्र कायम राहील. जनतेच्या मनात काय आहे, त्यांना पक्षीय घडामोडी पचनी पडल्या नाहीत, हे निकालातून स्पष्ट दिसतंय असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.