पार्था, लोकांमध्ये जाऊन कामं कर, रोहितचा पार्थ पवारांना सल्ला

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं आवाहन नातू रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी एका भावनिक फेसबुक पोस्टद्वारे शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र आणि नातू पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, यासाठी शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न […]

पार्था, लोकांमध्ये जाऊन कामं कर, रोहितचा पार्थ पवारांना सल्ला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं आवाहन नातू रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी एका भावनिक फेसबुक पोस्टद्वारे शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र आणि नातू पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, यासाठी शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, “मी फक्त फेसबुक पोस्ट टाकली आहे, जो काही निर्णय घ्यायचा तो पवार साहेबांनी घ्यायचा आहे. मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या निर्णयाने वाईट वाटले. पवार साहेबांवर कुठलाही दबाव नव्हता”

वाचा: रोहित राजेंद्र पवार… पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार नेमका कोण?

पार्थ पवारांना सल्ला

यावेळी रोहित पवार यांनी चुलत भाऊ पार्थ पवार यांना सल्लाही दिला. पार्थ पवारने आता लोकांशी संवाद साधायला हवा,  लोकांमध्ये जावे, त्यांचे काम करावे, असा सल्ला भाऊ रोहितने पार्थला दिला.

लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. छोट्यात छोटा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. शेवटी तोच आपला विचार, साहेबांचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवत असतो. लोकांच्या अडीअडचणी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे छोटा कार्यकर्ता आणि लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. या संवादाच्या माध्यमामातून ज्या अडचणी असतील, त्या पुढे जाऊन निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी इच्छा मी व्यक्त करतो, असं रोहित पवार म्हणाले.

सुजय विखे पाटलांबाबत प्रतिक्रिया

सुजय विखे पाटील यांनी विचार करायला हवा होता, कदाचित पुढे जाऊन सुजयचा विचार बदलेल, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

कोण आहेत रोहित पवार?

रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये दिसून येते. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.

वाचा – धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात……

रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदं :

1. मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड 2. अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद) 3. उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन 4. संचालक, आयएसईसी 5. नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट 6. कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया

VIDEO:

संबंधित बातम्या  

धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात……

पवार-विखेंचं वैर रोहित आणि सुजय मोडीत काढणार?

रोहित राजेंद्र पवार… पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार नेमका कोण?

एकीकडे बुलडाण्याच्या जागेवरुन वाद, दुसरीकडे तुपकर-रोहित गुप्त भेट  

पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार  

पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? : अजित पवार 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.