राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल (26 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 1:36 PM

पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल (26 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पुण्यात याबाबतची घोषणा केली आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनीही नुकतंच आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत रुपाली चाकणकर? 

रुपाली चाकणकर या सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्याशिवाय त्या पुण्यातील खडकवासला विधानसभा महिला अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लेक वाचवा’ अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनी महिला अत्याचार विरोधात अनेकदा आंदोलनं केले आहेत. तसेच बचतगटाच्या बचतगटच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्नही केला आहे.

संबंधित बातम्या : 

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, सर्व पदांचा राजीनामा

सोलापुरातल्या दोन आमदारांनीही राष्ट्रवादीची धाकधूक वाढवली

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.