रुपाली चाकणकरांची अजित पवारांना भावनिक साद

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रावादीच्या काही आमदारांना घेऊन थेट भाजपसोबत आघाडी करत सत्तास्थापन केली.

रुपाली चाकणकरांची अजित पवारांना भावनिक साद
Follow us
| Updated on: Nov 25, 2019 | 7:05 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रावादीच्या काही आमदारांना घेऊन थेट भाजपसोबत आघाडी करत सत्तास्थापन केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण अजित पवार यांनी परत यावे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar Facebook comment on ajit pawar post) यांनी भावनिक साद घेतली आहे.

अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. अजित पवार यांनी पक्षात परत यावे यासाठी त्यांना आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भेटून विनंती केली.

अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट केली. या पोस्टवर चाकणकर (Rupali chakankar Facebook comment on ajit pawar post) यांनी कॉमेंट करत अजित पवार यांना भावनिक आवाहन करत परत येण्याची विनंती केली.

“दादा महाराष्ट्रातील महिला भगिनींच्यावतीने तुमच्यापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून पोहचण्याचा प्रयत्न करतेय. इतरवेळी आमच्यासाठी सहजासहजी संपर्क होणारे “दादा”,परवापासून अचानक तटस्थ झाले….., दादा, एकच विनंती आहे, आयुष्यभर वडिलांची सावली ज्यांनी दिली, आभाळमाया दिली, कोजागिरी पौर्णिमेला ज्यांच्याबद्दल बोलताना तुमचा कंठ दाटून आला त्यांच्याकडे बघून एकदा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करा. शेवटी आयुष्याची संध्याकाळ होत असताना, आपली माणसं बरोबर असावी……इतकंच मागणं”, असं रुपाली चाकणकर यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीने त्यांना विधीमंडळ गटनेते पदावरुन काढून टाकले आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन बहुमत दाखवून शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी आम्ही 162 असे पोस्टर ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये लावलेले आहे. येथे महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.