कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोरोना लस, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगतोय. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार वाक् युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (Hasan Mushrif’s question to Devendra Fadnavis)
माझ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना नट-नट्या कशा सुचतात. माधुरी दीक्षित यांच्यासोबत माझी तुलना कशी करता येईल. ट्रम्प यांच्यासोबत नाव जोडल्याबद्दल आभारी आहे. पण एका महिलेशी तुलना कशी करता? असा सवाल हसन मुश्रीफांनी विचारलाय. तसंच ट्रम्प यांच्याबरोबर आणखी लोकप्रीय नेत्यांचं नाव जोडलं असतं तर चाललं असतं, असंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस हे विनाकारण राजकारण करत आहेत. कोरोना संपल्यानंतर सरकार अस्थित करण्याचे काही प्लॅन असतील तर ते करा, असा खोचक टोलाही मुश्रीफांनी फडणवीसांना लगावलाय.
हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हसन मुश्रीफ काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत त्यांना महाराष्ट्रबाहेर कुणी ओळखत नाही. पियुष गोयलांवर हसन मुश्रीफांनी टीका करणं चुकीचं आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं होतं.
‘उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे’, अशी खरमरीत टीका करणारे पीयूष गोयल यांच्यावर महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल हसन मुश्रीफ यांनी विचारला होता. कोरोनाच्या मुद्द्यावरुन राजकारण होऊ नये, ही स्वत: उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका चुकीची आहे. पीयूष गोयल हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असंही मुश्रीफ म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
VIDEO: शिवसेना आमदार संजय गायकवाड मागे हटेनात, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका
नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, थेट राज्यपालांकडे मागणी
Hasan Mushrif’s question to Devendra Fadnavis