सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, ऋतुराजची अवघ्या 21 वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात घाटणे येथील 21 वर्षाचा तरुणही विजयी झालाय. यासह तो सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरलाय.

सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, ऋतुराजची अवघ्या 21 वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 12:47 AM

सोलापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. 34 जिल्ह्यांमधील जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 16 जानेवारी रोजी मतदान झाले होते. याचा आज (18 जानेवारी) निकाल लागला आणि यात सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात घाटणे येथील 21 वर्षाचा तरुणही विजयी झालाय. यासह तो सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरलाय. ऋतुराज रवींद्र देशमुख असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या पॅनललाही मोठा विजय मिळालाय. आता सरपंचपदाचं आरक्षण सोडतीनंतर त्याला संधी मिळाली, तर तो सर्वात तरुण सरपंच होण्याचीही शक्यता आहे (Ruturaj Deshmukh Youngest Gram Panchayat Member from Ghatane Mohol Solapur).

ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केला. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज वेगळा ठरला.

या तरुणाने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ‘लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनल’ उभा करुन निवडणूक लढवली. ऋतुराजने ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जण विजयी झाले. स्वतः ऋतुराजला 103 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधातील उमेदवाराला 66 मतं मिळाली. सदस्य म्हणून निवडून आलेल्या ऋतुराजला सरपंचपद भूषवण्याची संधीही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व आरक्षण सोडतीवरच अवलंबून असणार आहे. आरक्षणाच्या सोडतीनंतर त्याला संधी मिळाली, तर सोलापूरचा ऋतुराज राज्यातील सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरेल.

हेही वाचा :

Jalgaon Gram Panchayat Election Results 2021 | जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : भिवंडीतील ‘या’ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, JCB मधून उधळला गुलाल

व्हिडीओ पाहा :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.