Devendra Fadnavis : भाजपकडून छोटे मन आणि मोठे मनाची उगाचं चर्चा, सामना अग्रलेखातून जोरदार टीका
राजकीय नाट्याचा शेवट राज भवनात झाला. त्यावेळी मात्र मोठे मन आणि छोटे मन मात्र पाहायला मिळाले. कारण त्यावेळी पक्षाने दिलेला आदेश पाळवा लागला. परंतु मोठे मन करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असं मेसेज बाहेर पेरला गेलाय.
मुंबई – “‘मन’ आणि ‘अपराध’ यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे. काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठय़ा मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती” अशी सामनाच्या (Samanaa) अग्रलेखातून भाजपवरती केली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू झाल्यापासून सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या (BJP) अनेक मोठ्या नेत्यांवरती टीका केली आहे.
महाराष्ट्राने नको असलेले राजकीय नाट्य पाहिलं
शिवसेना फोडण्यात भाजपाचा हात आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही सुरू आहे. त्याला कारणीभूत देखील भाजप आणि भाजपचे नेते आहेत. मुंबईत आलेल्या आलेल्या आमदारांना फुस लावून गुजरातमध्ये नेलं तिथं अस्थिरता जाणवू लागल्यानंतर त्यांना गुवाहाटीला नेलं. तिथून आकडेवारी नाचवली गेली. इतकी तितकी आकडेवारी सांगून आमदार फितवले गेले. अनेक राजकीय विचार करणाऱ्या लोकांना कधीही न पडलेले प्रश्न पडू लागले. सगळं काही आकलनेच्या बाहेर गेल्याचं पाहायला मिळालं. हे सगळं सुरु असताना हे कोणी केलंय हे देखील लक्षात आलं. पण तरी देखील त्यांच्याकडून राजकीय नाट्य त्यांनी त्यांच्या पद्धतीने सुरू ठेवलं. अजूनही राजकीय नाट्याचा प्रयोग संपला की नाही माहित नाही.
राजकीय नाट्याचा शेवट राज भवनात झाला
राजकीय नाट्याचा शेवट राज भवनात झाला. त्यावेळी मात्र मोठे मन आणि छोटे मन मात्र पाहायला मिळाले. कारण त्यावेळी पक्षाने दिलेला आदेश पाळवा लागला. परंतु मोठे मन करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असं मेसेज बाहेर पेरला गेलाय. मुळात पक्षश्रेष्ठींचा आदेश त्यांनी पाळला आहे. महाराष्ट्राची जबाबदारी स्विकारणाऱ्या दोन मु्ख्यमंत्र्यांकडून चांगली कामे घडावी ही अपेक्षा आहे. महाराष्ट्र सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे असाही टोला अग्रलेखातून लगावला आहे.