Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे.

Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला
जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 7:40 AM

मुंबई : राज्यसभेचे मतदान (Voting) राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. तरीही जे व्हायचे होते ते झाले. म्हणजे घोडाबाजार झाला. आता विधानपरिषदेची निवडणुक होणार आहे. ती गुप्तपद्धतीने निवडणुक होणार आहे. त्यामुळे अनेकांना नव्याने कोंब फुटला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा पद्धतीने वापर व्हावा हे योग्य नाही. तसेच लोकशाहीसाठी चांगलं देखील नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने (BJP) जिंकून दाखवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यामुळे आकाश कोसळलं आहे काय ? मुंगीने मेरू गिळला काय ? असे अजिबात झाले नाही अशी टीका आजच्या सामना (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.

आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे. ते अत्यंत चुकीचं आहे, कारण आमच्यात असं काही नाही. चार पाच अपक्षांना हाताशी धरून आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता. तसाच प्लॅन भाजपाचा देखील होता. राज्यसभेची सहावी जागा त्यांनी जिंकली. त्यामुळे ते जल्लोष करीत आहेत. जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. निवडणूक जिंकल्याने त्यांनी काही मोठा चमत्कार घडविला आहे अशा पद्धतीने अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत.

भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत

आजच्या सामानाच्या अग्रलेखात निवडणूकीत सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपाने काय केल त्याचा ऊहापोह घेण्यात आला आहे. ज्या पद्धतीने भाजपकडून बातम्या पेरल्या जात आहेत. त्या अत्यंत चुकीच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत गणिताचं चातुर्य दाखवलं. पण आमच्या आजही बहुमत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी अनिल देखमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करू दिलं नाही.

हे सुद्धा वाचा

केंद्राच्या यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात आहेत अशी टीका देखील करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.