‘गेंड्याची कातडीही जळेल, छे छे! यांना जाळायचं कसं? ही तर अफझल, औरंग्याच्या विचारांची अवलाद’

'या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील' असं म्हणत शिवसेना मुखपत्रातील अग्रलेखामध्ये जोरदार टीका करण्यात आलीय.

'गेंड्याची कातडीही जळेल, छे छे! यांना जाळायचं कसं? ही तर अफझल, औरंग्याच्या विचारांची अवलाद'
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 8:38 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिंथे गट म्हणत शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून (Saamana Editorial) प्रखर टीका करण्यात आलीय. शिंदे गटाच्या मुखवट्यामागे भ्रष्ट आणि बेइमान गेंड्याची कातडी असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. इतकंच काय तर, ही बाळासाहेबांच्या नव्हे तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद आहे, अशा शब्दांत घणाघाती टीका करण्यात आली.

महाराष्ट्राच्या शत्रूंना दफन करायलं हवं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेनं कायमचं गाडलं, असं त्यांच्या थडग्यांवर लिहायला हवं, असंही अग्रलेखात म्हटलंय. या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील, अशा शब्दांत शिवसेनेनं शिंदे गटावर टीका केलीय.

दीपक केसरकर यांच्यावर निशाणा

दीपक केसरकर यांच्यावरही शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केलाय. दीपक केसरकर यांचा उल्लेख बाजारबुणगा म्हणून करण्यात आला आहे. मंत्रीपदाचं गाजर दिसलं म्हणून केसरकर मिंधे गटात गेल्याचा आरोप करण्यात आलाय. केसरकर कधी कुणाचे होऊ शकले नाहीत. अनेक पक्षांत फिरुन हे महाशय शिवसेनेत आले होते, असंही त्यांना सुनावण्यात आलंय.

भाजप नामर्द- सामना

भाजप नामर्द असल्याची टीका सामना अग्रलेखातून करण्यात आलीय. भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार शिवेसनेचं अस्तित्त्व संपवण्यासाठी हे सगळं करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. खोकेबाज मिध्यांवर लोकं थुंकतात, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून टीका करण्यात आलीय.

शिवसेना हा शिवरायांचं अशं असून तो कसा मिटवाल, असा सवालही सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय. सर्व प्रकारचे हलाहल पचवून शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचा विश्वासही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.