‘हे कसले महानाट्य? हा तर….’ सामनातून अब्दुल सत्तार आणि गुलबराब पाटील यांच्यावर निशाणा
'मुख्यमंत्री बरोबर बोलले' सामना अग्रलेखातील उल्लेखाने आश्चर्य! एकनाथ शिंदे यांचं कोणतं वक्तव्य शिवसेनेला मान्य?
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या एका वक्तव्याचं उपहासात्मक समर्थन करण्यात आलं आहे. सोबतच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. सध्या अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय. या वक्तव्यांचा समाचार सामना अग्रलेखातून घेण्यात आला आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावण्यात आलाय. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महदळभद्री प्रयोग आहे, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून शिंदे गटाच्या नेत्यांना सुनावण्यात आलं आहे.
शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांचा उल्लेख नट म्हणून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका नाटकाच्या विक्रमी प्रयोगावेळी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ :
प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या विक्रमी प्रयोगावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की…
नाटकाचं काय घेऊन बसलात? आम्ही राज्यात 3 महिन्यांआधीच एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोकं चकीत झाले. त्या महानाट्याचे पदसाह आजही उमतायत.
मुख्यमंत्री बरोबर बोलले, असं म्हणत सामनातून टोला लगावला आहे. महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नट मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून राज्याची सुसंस्कृत जनता जोडेफेक करु लागलीये, अशा शब्दांत सामनातून टीका करण्यात आलीय.
हे कसलं महानाट्य? हा ततर दिल्लीने महाराष्ट्राच्या माथी मारलेला महादळभद्री प्रयोग आहे, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांवर करण्यात आलीय. तसंच या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्रात स्वाभिमान आणि सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, असा सल्लादेखील सामना अग्रलेखातून देण्यात आलाय. नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल, असा इशाराही शिवसेनेनं दिलाय.