चीनमध्ये कोरोना वाढला, भारतात खबरदारी, भारत जोडो यात्रेवर बंदीची मागणी, सामनातून हल्लाबोल
'भारत जोडो' यात्रेवरच बंदी नको!, सामनातून हल्लाबोल....
मुंबई : चीनमध्ये कोरोना वाढतो आहे. त्यामुळे जगभर खबरदारी घेतली जातेय. भारतानेही सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यातच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) बंदीची मागणी केली जात आहे. यावर सामनातून (Saamana Editorial) भाष्य करण्यात आलं आहे. फक्त ‘भारत जोडो’ यात्रेवरच बंदी नको!, अशी मागणी करण्यात आली आहे.
गलकाँग, तैवान, इटली, दक्षिण कोरियात 10 हजारांवर लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. या देशांत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे व ही चीनची देणगी आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवणे हाच कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय आहे. मनसुख मांडविय यांनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर निर्बंध घालण्याचे सुचवले, पण उद्याच्या नववर्षाच्या स्वागताचे सोहळे, उत्सव, त्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण कसे करणार? भाजपचे राजकीय सोहळेही बिनबोभाट सुरूच असतात. त्यामुळे फक्त ‘भारत जोडो’ यात्रेवरच वाकडी नजर नको!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी भव्य इफ्रास्ट्रक्चर उभे करीत होते. मुंबईसारख्या शहरात भव्य जम्बो कोविड सेंटर्स नाहीतर उभीच राहिली नसती. ‘धारावी पॅटर्न’चे कौतुक तर ‘युनो’ने केले. आता ही सर्व तयारी पुन्हा एकदा करावी लागेल असे दिसते. कोरोनाचा नवीन व्हेरियंट पुन्हा एकदा चीनमधूनच बाहेर पडेल. आपण सावध राहणं गरजेचं आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
2023 मध्ये चीनमध्ये 10 लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होईल. संभाव्य नव्या तीन लाटांपैकी पहिली लाट सध्या चीनमध्ये आली आहे. त्यानंतर जानेवारीच्या मध्यात दुसरी लाट येईल. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.