“ठणठणीत अर्थव्यवस्था दमली, खणखणीत रुपयाही खंगला”, सामनातून सांगितली ‘दमलेल्या’ सरकारची कहानी

Saamana Editorial: आजच्या सामनातून अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थिती भाष्य करण्यात आलं आहे. "ठणठणीत अर्थव्यवस्था दमली, खणखणीत रुपयाही खंगला", अश्या शब्दात केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

ठणठणीत अर्थव्यवस्था दमली, खणखणीत रुपयाही खंगला, सामनातून सांगितली 'दमलेल्या' सरकारची कहानी
नरेंद्र मोदी,उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 7:11 AM

मुंबई : आजच्या सामनातून (Saamana Editorial) अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थिती भाष्य करण्यात आलं आहे. “ठणठणीत अर्थव्यवस्था दमली, खणखणीत रुपयाही खंगला”, अश्या शब्दात केंद्र सरकारवर (Central Government) टीका करण्यात आली आहे. “केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहेत. ना अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली ना रुपयाला. उलट त्याआधी ठणठणीत असलेली अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला. आपल्या देशाचा बोलबाला जगात फक्त मागील आठ वर्षांतच झाला, असे ढोल सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक सर्रास पिटतात; परंतु सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली ‘न भूतों’ घसरण आणि शेअर बाजारातील पडझड ही आपल्या ‘दमलेल्या सरकारची खरी कहाणी आहे. नवीन कहाणी लिहिण्यासाठी जनताजनार्दनालाच आता शंखध्वनी करावा लागणार आहे”, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात सुमारे साडेसात टक्के दराने घोडदौड करील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी म्हणाल्या आणि सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया आजवरच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची तब्बल 19 पैशांची घसरण झाली. म्हणजे एका डॉलरसाठी आता 80.11 रुपये मोजावे लागणार आहेत. रुपयाची ही पडझड भविष्यातही थांबण्याची चिन्हे नाहीत. तरीही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेबद्दल एक गुलाबी चित्र रंगविले. आता अर्थमंत्री असल्याने अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, रुपया, महागाई याबाबत ‘सगळे कसे छान छान’ असेच त्यांना बोलावे लागणार हे उघड आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही आणि जनतेला बसणारा महागाईचा मारदेखील चुकत नाही. अर्थमंत्री ज्या रविवारी सांगतात की, आर्थिक विकासाचा दर या वर्षीच नाही, तर पुढील आर्थिक वर्षातही साडेसात टक्क्यांच्या आसपासच राहील तोच रविवार शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक संडे’ ठरतो या विरोधाभासाला काय म्हणायचे? सोमवारी रुपया आजवरच्या सर्वाधिक नीचांकी गेला तर सेन्सेक्स 1250 अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. देशाच्या अर्थमंत्र्यांचा दावा आणि प्रत्यक्षातील स्थिती यांचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्नच आहे.

. काहीच दिवसांपूर्वी सीतारामन यांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून देशात मंदीची शक्यता नाही, असे म्हटले होते. मंदीची शक्यता नाही हे त्यांचे म्हणणे एकवेळ समजून घेतले तरी महागाई नियंत्रणात आणल्याच्या दाव्याचे काय? त्यांचा हा दावा आणि प्रत्यक्षात भडकलेल्या महागाईचा वणवा यांचा ताळमेळ कसा घालणार? किंबहुना, एप्रिलमध्ये देशातील किरकोळ चलनवाढीचा दर 7.79 टक्के एवढा चिंताजनक नोंदवला गेला होता. त्यामुळेच आपल्या रिझर्व्ह बँकेलाही देशातील महागाई आटोक्याबाहेर चालल्याची जाणीव झाली आणि सलग दहा वेळा रेपो दर ‘जैसे थे’ ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेने मागील दोन तिमाहीत त्यात बदल करून कठोर धोरणाचे संकेत दिले. तरीही केंद्रीय अर्थमंत्र्यांना ‘देशातील महागाई खूप नाही’ असे वाटले होते. आताही कदाचित ‘रुपयाची घसरण खूप नाही’ असे त्यांना वाटू शकते. कारण देशाची अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, विद्यमान केंद्र सरकारच्या कार्यकाळात घसरणीलाच लागले आहेत. ना अर्थव्यवस्था सावरली गेली आहे ना रुपया! कोरोना महामारी आणि लॉक डाऊनचे संकट तर मागील दोन-सवादोन वर्षांत कोसळले.

हे सुद्धा वाचा

सातत्याने रुपयाचे अवमूल्यन होतेच आहे आणि रुपयाचे मूल्य टिकवून ठेवण्याची कसरत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला मौल्यवान परकीय चलन खर्च करावे लागत आहे. त्यातून परकीय चलनाचा साठा आणखी कमी होणार आणि त्यामुळे रुपयाच्या घसरगुंडीचा वेग वाढताच राहणार असे हे दुष्टचक्र मागील आठ वर्षांपासून सुरू आहे. तरीही आपली अर्थव्यवस्था सध्या साडेसात टक्क्यांच्या वेगाने धावत असल्याचे अर्थमंत्र्यांना दिसत आहे. आता साक्षात अर्थमंत्र्यांना दिसते म्हटल्यावर जनतेला न दिसण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहेत. ना अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली ना रुपयाला. उलट त्याआधी ठणठणीत असलेली अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला. आपल्या देशाचा बोलबाला जगात फक्त मागील आठ वर्षांतच झाला, असे ढोल सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक सर्रास पिटतात; परंतु सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली ‘न भूतो’ घसरण आणि शेअर बाजारातील पडझड ही आपल्या ‘दमलेल्या’ सरकारची खरी कहाणी आहे. नवीन कहाणी लिहिण्यासाठी जनताजनार्दनालाच आता शंखध्वनी करावा लागणार आहे.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय, फक्त घसरणीलाच लागले आहेत. ना अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली ना रुपयाला. उलट त्याआधी ठणठणीत असलेली अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला. आपल्या देशाचा बोलबाला जगात फक्त मागील आठ वर्षांतच झाला, असे ढोल सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक सर्रास पिटतात; परंतु सोमवारी रुपयाची पुन्हा झालेली ‘न भूतों’ घसरण आणि शेअर बाजारातील पडझड ही आपल्या ‘दमलेल्या सरकारची खरी कहाणी आहे. नवीन कहाणी लिहिण्यासाठी जनताजनार्दनालाच आता शंखध्वनी करावा लागणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.