‘कलंक’ मतीचा झडो!; सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले, त्यांच्या पंक्तीला बसणं बरं आहे काय? देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराच!; 'कलंक'वरून आरोप प्रत्यारोप, सामनातून देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

'कलंक' मतीचा झडो!; सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 7:42 AM

मुंबई : ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. या सगळ्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘कलंक’ मतीचा झडो!, या शीर्षकाखाली हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

फडणवीस म्हणतात, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?’ देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिंधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच.

आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा,भुजबळ – हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळय़ांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱया वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना!

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ‘कलंक’ मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदन्घ्री ‘कमळी’ दडो मुरडीता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव्त्चरित्री जडो – मोरोपंत (केकावली)

महाराष्ट्रातील संस्कृती ‘कलंकित’ करण्याचा विडा काही लोकांनी स्वीकारला आहे. त्यांच्यासाठी मोरोपंतांच्या या ओळी मार्गदर्शक ठराव्यात. काही लोकांची मती कलंकित झाली आहे आणि त्यांची कलंकित मती हेच महाराष्ट्राचे ज्ञान, शहाणपण व मास्टर स्ट्रोक असा काही जणांनी समज करून घेतला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मास्टर स्ट्रोक’ मारतात असे त्यांचे पगारी भगतगण नेहमी सांगतात. लोकमान्य टिळक सांगायचे, एक आण्याचा गांजा, चिलीम मारली की भरपूर कल्पना काही लोकांना सुचतात. भाजपच्या पगारी भजनी मंडळाचे तसेच आहे.

नागपूरही आता खऱ्या संघ विचारांचे उरलेले नाही. तेथे भेसळच फार झाली आहे. क्षणभंगूर सत्ता संपादनासाठी भ्रष्टाचारी लोकांशी शय्यासोबत करण्यास नैतिकतेचे बिरुद मिरवणाऱयांनाही लाज वाटत नाही. अजित पवार, मुश्रीफ, गोंदियाचे पटेल, भुजबळ हे कलंकित की स्वच्छ राजकीय चारित्र्याचे हे फडणवीसांनी जाहीर करावे.

फुटलेल्या शिवसेना आमदारांवरील ‘ईडी’ कारवाईच्या फायली कोणत्या बैलांच्या गोठय़ात दडपून त्यावर शेणसडय़ांनी सारवण केले तेसुद्धा सांगा. महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेची माहिती नसलेले लोक सत्तेवर विराजमान झाले.

महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना!

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.