अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस देण्यासाठी ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर, किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, शिवसेनेचा टोला

पण ते पॅकेज कुठे जिरले, त्यातून काय उगवले ते सरकारलाच माहित, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. (Saamana Editorial on Diwali And Economy crisis)

अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस देण्यासाठी ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर, किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, शिवसेनेचा टोला
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 8:01 AM

मुंबई : देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात कोरोनाचा अंधार कायमचा दूर होऊ दे!, अशी आशा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून वर्तवण्यात आली आहे. तसेच केंद्रातील सरकारने काही लाख कोटींचे पॅकेज मागे जाहीर केले. पण ते पॅकेज कुठे जिरले, त्यातून काय उगवले ते सरकारलाच माहित, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. (Saamana Editorial on Diwali And Economy crisis)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे?

तूर्त तरी कोरोनाचे भय थोडे बाजूला ठेवून दिवाळीच्या आनंदाचा, चैतन्याचा आणि उत्साहाचाच विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे आणि तो बाजारपेठांमधील गर्दीतून दिसत आहे. फक्त त्याला कोरोना निर्बंधांचे बंधन घालायला जनतेने विसरू नये इतकेच! इडा-पीडा बाहेर जाते आणि बाहेरची लक्ष्मी घरात येते असा हा दिवाळी सण. पुढील तीन दिवस महाराष्ट्रासह देशातील घराघरात हेच चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण असेल. दिवाळीच्या लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात कोरोनाचा अंधार कायमचा दूर होऊ दे! कोरोनाची पीडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घराघरांत येऊ दे!!

चैतन्याचे प्रकाशपर्व असलेल्या दिवाळीला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा सगळेच सण-उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आले आणि गेले. दिवाळीसारख्या सणावरही कोरोनाची ‘सावली’आहेच, पण तरीही दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या आहेत. कोरोना संकटाचे सावट काही काळापुरते झुगारून देत लोकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली दिसत आहे. हा दिवाळीसारख्या ऊर्जा आणि चैतन्य जागृत करणाऱया सणाचा परिणाम असेल. कदाचित मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आलेख काही प्रमाणात खाली आल्यामुळेही जनतेची भीड थोडी चेपली असेल.

कारण काहीही असले तरी दिवाळीसाठी बाजारात लोकांची गर्दी झाली हे खरे आहे. अर्थात, ही गर्दी व्यापार-उद्योगाचा उत्साह वाढविणारी असली तरी दुसरीकडे काळजी, तणाव वाढविणारीदेखील आहे. कारण कोरोनाचा आलेख थोडा खाली आला असला तरी धोका कायमच आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी जनतेने घ्यायलाच हवी. कोरोनाचा आलेख खाली येणे हा जनता आणि सरकार या दोघांनीही मागील सहा-सात महिन्यांत जो संयम पाळला, कोरोना बंधनांचे काटेकोर पालन केले त्याचाच परिणाम आहे. मात्र अद्यापि हे भयंकर संकट दूर झालेले नाही. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले, त्यांचा मृत्युदर कमी आणि सुधारणा दर वाढला असला तरी कोरोनाचा विषाणू हा दबा धरून बसलेलाच आहे.

त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना उत्साहाबरोबरच खबरदारीही घ्यावीच लागेल. बाजारात फिरताना कोरोनाची जी बंधने आहेत. ती पाळणे सगळय़ांच्याच हिताचे राहील. दिवाळी हा प्रकाशाचा, दिव्यांचा सण, त्यामुळे पणत्यांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळणारच आहे. तो उजळायलाच हवा, पण प्रश्न आहे फटाक्यांचा. कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक हानिकारक ठरतो तो माणसाच्या श्वसन यंत्रणा आणि फुप्फुसांना. साहजिकच, कोरोनाचे संकट कायम असताना फटाक्यांचे प्रदूषण करणे आणि संसर्ग वाढविणे परवडणारे नाही. दिवाळी साजरी करताना त्याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. दिव्यांची रोषणाई करा, फटाक्यांच्या आतषबाजीला आवर घाला, असे आवाहन शिवसेनेतून करण्यात आलं आहे.

नवीन खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त नक्की साधा, पण कोरोनाच्या मर्यादांचे पालन करा. कोरोनामुळे आलेले लॉक डाऊन, त्यामुळे ‘डाऊन’ झालेली अर्थव्यवस्था आणि त्यातून बिघडलेले अर्थचक्र या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आली आहे. त्यात यंदाही अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या अवेळी तडाख्यांनी बळीराजाचे हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक हिरावून नेले. काही कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. कोटय़वधी बेरोजगार तरुण नोकऱ्यांपासून वंचित आहेत. सर्वच क्षेत्रांत मंदीची लाट आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली होतीच, त्यात कोरोना आणि लॉक डाऊनमुळे तिचे पार कंबरडेच मोडले आहे.

केंद्रातील सरकारने काही लाख कोटींचे पॅकेज मागे जाहीर केले. अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस’ दिला असे आव आणीत सांगितले; पण ते पॅकेज कुठे जिरले, त्यातून काय उगवले ते सरकारलाच माहीत. आताही ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान-3’ची घोषणा करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2 लाख 64 हजार कोटी रुपयांचे आणखी एक पॅकेज जाहीर केले आहे. त्यातही अनेक घोषणा, सवलती, आश्वासने देण्यात आली आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने हे ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीला किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.  (Saamana Editorial on Diwali And Economy crisis)

संबंधित बातम्या : 

Diwali 2020 | दिवाळीच्या खास दिवशी लक्ष्मीमातेसाठी बनवा ‘या’ गोड पदार्थांचा नैवेद्य!

Diwali 2020 | बॉलिवूड अभिनेत्रींच्या ‘इंडो-वेस्टर्न’ लूकसह दिवाळीत सजा ‘पिक्चर परफेक्ट’!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.