‘भाजप नाच्या पोरांसारखा बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच!’ सामना अग्रलेखातून शिवसेनेचा हल्लाबोल

Saamana Editorial on Navneet Rana Ravi Rana : मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

'भाजप नाच्या पोरांसारखा बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच!' सामना अग्रलेखातून शिवसेनेचा हल्लाबोल
नवनीत राणा आणि रवी राणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:46 AM

मुंबई : शिवसेनेचं (Shiv sena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून (Saamana Editorial) राणा दाम्पत्य आणि हनुमान चालिसेवरुन सुरु असलेल्या घडामोडींवर निशाणा साधण्यात आला आहे. दैनिक सामानाच्या अग्रलेखातून ‘घोटाळेबाजांचे हिंदुत्व आणि नुसताच थयथयाट’ या शिर्षकाखाली भाजपनं ऑफर दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा, अशी ऑफर बाजारात आलेली दिसते, असं म्हणत सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. भाजपवाले चोर लफंग्यांचे समर्थन करत असल्याचीही टीका यावेळी करण्यात आली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Kirit Somaiya Car attack) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्याला सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलंय. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी आणि अफरातफरीचे आहेत, असाही टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.

भाजपचा उल्लेख ‘नाच्या’ म्हणून..

संसदेत श्रीरामाच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच आहे.

या शब्दांत सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. राणा दाम्पतायाला पुढे करुन मुंबईत वातावरण बिघडवायचे हेच ठरवलं होतं आणि त्याबरहुकूम सगळं घडलं, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. यामागे भाजपचंच कुचकं डोकं आहे, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

फसवाफसवी आणि अफरातफरी…

अमरावती लोकसभा हा राखीव मतदारसंघ आहे. निवडूक लढवण्यासाठी नवनीत कौर राणा यांनी अनुसूचित जातीचं खोटं प्रमाणपत्र तायर केलं. या फसवणुकीवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन वेळकाढूपणा चालवाल्याचाही आरोप सामना अग्रलेखातून केला गेलाय.

राम सत्यवचनी होती. हनुमान त्या रामाचा भक्त होता. खोटेपणाच्या पायावर उभ्या असलेल्या नवनीत राणा हनुमान चालिसेचं राजकराण करतात आणि समस्त भाजप या भंपकपणाच्या नौटंकीत टाळ्या वाजवत नाचतोय, असाही टोला शिवसेनेकडून लगावण्यात आलाय. काँग्रेसमध्ये असताना ईडीच्या भयाने जे शेपट्या आत घालून भाजपचे गुलाम झाले, असे लोक शिवसेनेला आव्हान देत आहेत. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवीचे आणि अफरातफरीचे आहेत, असं म्हणत या संपूर्ण प्रकरणी भाजपवर शिवसेनेनं हल्लाबोल केलाय.

Ravi Rana : आमदार रवी राणा यांचा आजचा मुक्काम तळोजा जेलमध्ये, आणखी किती अडचणी वाढणार?

Amruta Fadnavis : “उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? बायकोच्या भावाच्या ताब्यात?” अमृता फडणवीसांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Shalini Thackeray : थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं! शालीनी ठाकरे यांनी पुन्हा सेनेला डिवचलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.