लाल किल्ल्यावरून मोदी यांचं हे शेवटचं भाषण, 140 कोटी लोकांची शापवाणी ठरू शकेल!; सामनातून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर टीका

Saamana Editorial on PM Narednra Modi Independence Day Speech : लाल किल्ल्यावरून... दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी हे काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या गुंत्यात अडकून पडले आहेत!; सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका

लाल किल्ल्यावरून मोदी यांचं हे शेवटचं भाषण, 140 कोटी लोकांची शापवाणी ठरू शकेल!; सामनातून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर टीका
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 8:13 AM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : 15ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी त्यानी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मणिपूरच्या मुद्द्यावर बोलताना देशातील लोक तुमच्यासोबत आहेत, असं मोदींनी म्हटलं. शिवाय येत्या काळात देश वेगाने प्रगती करेन, असंही मोदी म्हणाले त्यांच्या या भाषणावर आजच्या सामनातून टीका करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरून… या शीर्षकाखाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून मोदींच्या भाषणावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशभरात प्रत्येक महत्त्वाच्या पदावर आज गुजरातमधूनच माणसे भरली जातात. हीसुद्धा एक प्रकारची घराणेशाहीच आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री एकाच राज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते. सर्वसूत्रे व अंमलबजावणीचे अधिकार आपल्याच हाती असावेत याच ‘उदात्त’ हेतूने हे सर्व सुरूआहे. हे घराणेशाहीचेच रूप आहे . देशातील न्याययंत्रणा , निवडणूक आयोग , तपास यंत्रणा , राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत . घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते . आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असेल . त्यामुळे ‘ लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे ‘ ही लालू यादवांची भविष्यवाणी ही 140 कोटी लोकांची , स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल!

देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय संबोधन केले, त्यात नवे काय होते? तेच, तेच आणि तेच. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस दहा वर्षे होत आली व लाल किल्ल्यावरचे त्यांचे हे नववे भाषण. मोदी व शहांनी घेतल्याच तर देश सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाईल. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळय़ात सांगितले की, ‘लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे.” श्री. लालू यादव जे बोलले ते खरे ठरो, लालू यादवांच्या तोंडात साखर पडो अशा प्रकारच्या भावना देशाच्या गावागावांत आहेत.

लाल किल्ल्यावर 2024 चा तिरंगा मोदी फडकवणार नाहीत असे एकंदरीत वातावरण आहे. लालू यादव यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडल्यामुळे त्यांच्या घरावर ‘ईडी’च्या धाडी नव्याने पडू शकतील व एखाद्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवून यादव कुटुंबाचा छळ केला जाईल. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशात यापेक्षा वेगळे काहीच घडत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी लोकशाहीच्या पिपाण्या वाजवणे, तिरंगा फडकवून भाषणे देणे हा एक उपचार झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात 140 कोटी लोकसंख्येचा उल्लेख केला. आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या 40 कोटी होती. 77 वर्षांत आपण 140 कोटींवर पोहोचलो, पण 140 कोटी जनता स्वातंत्र्य मिळाल्याचे सुख खरोखर भोगत आहे काय?

मोदी यांनी जनतेला असे आश्वासन दिले की, ‘मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ’ मात्र यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले? ते आधी सांगा. पंतप्रधान मोदी 90 कोटी लोकांना फुकट रेशन देतात. त्या फुकट रेशनसाठी जनता भिकेचा कटोरा घेऊन रांगेत व रांगत उभी राहते. हेच विकास आणि प्रगतीचे लक्षण मानायचे काय? लोकांना असे पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही.

Non Stop LIVE Update
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.