“रुपया रोजच घसरतोय, देशाची अप्रतिष्ठा होतेय”, अर्थव्यवस्थेवर भाष्य करत सामनातून मोदींवर टीका

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारतीय अर्थव्यवस्था आणि घसरता रुपया यावर भाष्य करण्यात आलं आहे. वाचा...

रुपया रोजच घसरतोय, देशाची अप्रतिष्ठा होतेय, अर्थव्यवस्थेवर भाष्य करत सामनातून मोदींवर टीका
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 8:34 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) आणि घसरता रुपया यावर भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या काळात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 67 वरून 68 वर जाऊन पोहोचली त्यावेळी भाजपने संसदेत सरकारवर कडाडून हल्ला चढवला होता. ‘रुपया हा केवळ कागदाचा एक तुकडा नाही, तर त्यावरून देशाची प्रतिष्ठा ठरत असते’, असे विधान भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यावेळी संसदेत केले होते. सुषमा स्वराज यांनी खरे तेच सांगितले होते. आज तर रुपया रोजच कोसळतो आहे आणि जागतिक पातळीवर रोजच देशाची अप्रतिष्ठा होत आहे. ती रोखण्यासाठी सरकार काही करणार आहे काय?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

आपला देश लवकरच आर्थिक महासत्ता म्हणून ओळखला जाईल, अशा गर्जना केंद्रातील सत्तापक्षाकडून वारंवार केल्या जातात. तसे खरोखरच होणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. आपण महासत्ता होऊ तेव्हा होऊ, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची जी भयंकर घसरगुंडी सुरू आहे, त्यामुळे देशाची इभ्रत धुळीस मिळते आहे. ही इभ्रत आणि देशाची पत राखण्यासाठी केंद्रीय सरकार काय करते आहे? आर्थिक महासत्तेचे नंतर बघू, तूर्तास कोसळणाऱ्या रुपयाला कसे सावरणार, हे सरकारने देशवासीयांना सांगावे, असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

ब्रिटनला मागे टाकून आपण कशी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतो आहोत व आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने झेप घेत आहोत, असे सुंदर काल्पनिक चित्र सरकारकडून रंगवले जात आहे. तथापि, सरकार पक्षाकडून अर्थव्यवस्थेविषयी केले जाणारे दावे आणि प्रत्यक्षात असलेली अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर धडधडीत दिसत असताना आर्थिक महासत्तेचे स्वप्नरंजन म्हणजे केवळ पोकळ बाता आहेत, असं म्हणत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनीच मध्यंतरी ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला जे खडे बोल सुनावले ते देशाच्या अर्थव्यवस्थेची गंभीर स्थिती चव्हाटय़ावर आणणारेच आहेत. 20 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली जगत आहेत. 23 कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न 375 रुपयांहून कमी आहे. बेरोजगारीचा दर 7.6 टक्के झाला आहे, अशी आकडेवारीच होसबाळे यांनी एका कार्यक्रमात मांडली, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.