देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा!; पंतप्रधान मोदींच्या सन्मान सोहळ्याआधी संजय राऊतांचं साकडं

Saamana Editorial on PM Narendra Modi Pune Daura : टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिला जातोय; लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याआधी सामनातून टीकास्त्र

देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा!; पंतप्रधान मोदींच्या सन्मान सोहळ्याआधी संजय राऊतांचं साकडं
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 7:54 AM

मुंबई | 01 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यावर ठाकरे गटाची नाराजी पाहायला मिळत आहे. आजच्या सामनातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत, असं सामना म्हणण्यात आलं आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशावेळी श्री. शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘ इंडिया फ्रंट ‘ च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे . या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील . अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे . नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात . देवा , दगडूशेठ गणराया , तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा ! पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी , गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन !

गरीबांच्याचुकांपेक्षामोठय़ांचीचपातके

लोकांसअधिकभोगावीलागता

– लोकमान्यटिळक

टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पुण्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भव्य मंडप, पायघडय़ा वगैरे घातल्या आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आपले पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चा, अभिषेक, आरती वगैरे करणार आहेत. पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसब्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे मोदी भेटीत भाजप स्वतःचीही महाआरती करून घेईल.

हे सर्व ते करतील याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते परहस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या आधी हा पुरस्कार इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, साईरस पुनावाला, एस. एम. जोशी अशा महान लोकांना देण्यात आला. या लोकांमुळे पुरस्कारही मोठा झाला. मोदी हे आज पंतप्रधान आहेत. त्यांनी जनतेत देशभक्तीची भावना जागवली, भारत आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न सुरू केले या कारणांसाठी त्यांना टिळक पुरस्कार देण्यात येत आहे.

हिंद स्वराज ट्रस्टवर सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून बरेच जण काँग्रेस विचारांचे आहेत. त्यात शरद पवारसुद्धा आहेत व काँग्रेस वगैरे लोकांनी मिळून मोदी यांना टिळक पुरस्कार जाहीर केला व मोदींनी तो अर्थात स्वीकारला. मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते; पण टिळक कुटुंब हे बरेचसे भाजपमय झाले. त्यामुळे टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.