शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे भाजपमध्ये चालणार नाही, शिवसेनेची उदयनराजेंना समज

शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही.

शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे भाजपमध्ये चालणार नाही, शिवसेनेची उदयनराजेंना समज
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 9:36 AM

मुंबई : शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा अशा शब्दात राष्ट्रवादीतून नुकत्याच भाजपत आलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale saamana editorial) यांची सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) कानउघडणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर असताना शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा. पण याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे आणि ते दिल्लीत आहे अशी समजही सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) उदयनराजेंना (Udayanraje Bhosale saamana editorial) देण्यात आली आहे.

थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale saamana editorial) दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला. भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. त्यामुळे राजांना शिस्तीचे वळण लागत आहे, अभिनंदन! असेही सामनाच्या अग्रलेखात (Saamna Editorial) म्हटलं आहे.

साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा मार्ग स्वीकारला आहे. आयाराम-गयारामांचा मुसळधार मोसम सध्या सुरूच आहे. पाऊस थांबत नाही तसा हा मोसमही थांबत नाही. इतर सर्व मंडळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेत असतात, पण उदयनराजे (Udayanraje Bhosale BJP) हे शिवरायांच्या सातारच्या गादीचे तेरावे वंशज असल्याने त्यांचा प्रवेश अमित शहा यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर झाला आहे. उदयनराजे हे शिवरायांचे 13 वे वंशज आहेत म्हणून समाजात त्यांना मान आहे, पण असे शिवरायांचे थेट वंशज कोल्हापूरच्या गादीचे संभाजी छत्रपतीदेखील आहेत. महाराष्ट्रातील विविध सामाजिक उपक्रमात कोल्हापूरचे छत्रपती आघाडीवर असतात.

संभाजी छत्रपती हे राज्यसभेत आहेत व भाजपने त्यांना नेमले आहे. भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले आणि आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. साताऱ्याचे राजे युती परिवारात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडंच. अशाप्रकारे उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale BJP) भाजप प्रवेशाच्या निर्णयाचे कोडकौतुक केलं आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपाविषयी भूमिका वेगळी होती आणि ती टोकाची होती. ‘‘कोण मोदी? आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत’’ असा त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करीत बजावले होते. मोदी सरकारने लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिले असा संताप त्यांनी कॉलर उडवत व्यक्त केला होता. मात्र आता त्यांनी मन बदलले आहे. मोदी-शहा हे शिवरायांच्या विचाराने कार्य करीत असल्याचे विचार मांडले आहेत, असेही सामनातून म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना जेरीस आणले होते. एरवी तीन-चार लाखांच्या मताधिक्याने जिंकणारे राजे या वेळी ‘दम’ खात जिंकले. उदयनराजे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते आणि साताऱ्यातील तरुण वर्गात त्यांचा वावर आहे. उदयनराजे यांना जाळय़ात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हते, तर सर्वच जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. असेही सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल. अर्थात उदयनराजे यांनी अत्यंत विचारपूर्वकच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असेल असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.