“भाजपने सावरकरांचे खेळणे केले”, सामनातून जोरदार हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदेगटावर निशाणा साधण्यात आलाय. वाचा सविस्तर...

भाजपने सावरकरांचे खेळणे केले, सामनातून जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 8:57 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजप आणि शिंदेगटावर निशाणा साधण्यात आलाय. “राहुल गांधींनी काही वक्तव्य केले की, भाजपवाल्यांना सावरकरांचे (Vinayak Damodar Savarkar) स्मरण होते. तथाकथित माफी प्रकरणाचा रिकामा खुळखुळा वाजवत बसण्यापेक्षा सावरकरांचे हिंदुत्व, हिंदू राष्ट्राचा विचार, हिंदुत्वाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन, सैनिकीकरणावरील भर यावर देशातील प्रत्येक विद्यापीठात ‘अध्यासन’ असायला हवे.सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला”, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. आताही महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या राहुल गांधीकृत अपमानावर संताप व्यक्त केला. सावरकरांच्या अपमानाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. आम्हीही यासंदर्भातील आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे, पण फडणवीसांच्या संतप्त भावना खऱ्या आहेत काय?, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या सुरू आहे. त्या यात्रेदरम्यान तीन दिवसांपूर्वी कर्नाटकातील तिरुवेकरे येथे पत्रकारांशी बोलतांना राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर आरोप केले. ‘स्वातंत्र्ययुद्धात सावरकर हे इंग्रजांसाठी काम करीत होते. त्याचा त्यांना इंग्रजांकडून मोबदलाही मिळत होता,’ असे ते म्हणाले. राहुल गांधी यांचे सावरकरांवरील असे आरोप धक्कादायक असले तरी नवीन नाहीत. तसेच त्यानिमित्ताने भाजपवाल्यांना येणारे सावरकरप्रेमाचे उमाळेही नवीन नाहीत, अशा शब्दात राहुल गांधींसह भाजपवर टीका करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.