26/11 च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य, अग्रलेखात नेमकं काय? वाचा….

सामनाच्या आजच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे.

26/11 च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य, अग्रलेखात नेमकं काय? वाचा....
तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 8:02 AM

मुंबई : आज 26/11. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस. याचपार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर (Northeast Violence )भाष्य करण्यात आलं आहे. “ईशान्य हिंदुस्थान आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे अशांत आहे. त्यात तेथील सीमावादांचे ‘ज्वालामुखी ‘ धगधगत राहिले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच घातक ठरेल . ईशान्येचा विकास आपल्याच राजवटीत झाला , तेथील शांततेसाठी जेवढे प्रयत्न मागील सात – आठ वर्षांत झाले तेवढे पूर्वी झाले नाहीत , असा दावा केंद्रातील विद्यमान सरकार नेहमीच करीत असते . आसाम आणि मेघालय सीमेवर मंगळवारी झालेल्या हिंसाचाराने या फुग्याला टाचणी लावली आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

“गेल्या वर्षी आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यात आसाम पोलिसांचे सहा जवान ठार झाले होते. आता आसाम-मेघालय सीमावादाचा हिंसक उद्रेक झाला आणि आसामच्या एका वन कर्मचाऱ्यासह सहा नागरिकांचा बळी गेला. आसाम आणि मेघालय यांच्यातील 12 पैकी 6 वादग्रस्त मुद्दय़ांवर परस्पर समझोता होऊनही आणि उर्वरित मुद्दय़ांबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही मंगळवारचा रक्तरंजित हिंसाचार कसा घडला? तो घडला की घडवला गेला? गोळीबार आवश्यक होता की अनावश्यक?”, असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही सध्या वातावरण पेटलेलेच आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आगलावेपणा आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारची बोटचेपी भूमिका यामुळे मराठी सीमाबांधव आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेत तीव्र संतापाची भावना आहे. हेच तिकडे आसाम आणि मेघालयासह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानातही घडत आहे. मागील काही वर्षांतील आसाम राज्याचे आक्रमक धोरण ईशान्येतील सीमावादासंदर्भात वादग्रस्त ठरले आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.