“लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले तरी…” संजय राऊतांचा गंभीर आरोप

"गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील हे चित्र आहे. मिंधे यांचे सरकार काय लायकीचे आहे व या राजवटीत जनता किती त्रस्त आहे ते गडचिरोली घटनेवरून दिसते", अशी टीका संजय राऊतांनी केली.

लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले तरी... संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांचा उपरोधिक टोला
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 9:26 AM

Sanjay Raut Big Allegation : “राज्याच्या आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचार व कमिशनबाजीचे वारंवार आरोप होत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्या या लाडक्या मंत्र्यांना पाठीशी घालण्यात दंग आहेत. लाडक्या बहिणी आणि त्यांची बालके मात्र आरोग्य सुविधांअभावी हकनाक जीव गमावत आहेत”, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णवाहिका नसल्याने दोन लेकरांचे मृतदेह खांद्यावर टाकून नेत असलेल्या आई-वडिलांचा फोटो व्हायरल झाला. आता यावरुन संजय राऊतांनी टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी गडचिरोलीतील घडलेल्या घटनेवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. “महाराष्ट्राचे हे चित्र मुख्यमंत्री व त्यांच्या टोळीला विचलित करीत नाही काय?” असा प्रश्नही संजय राऊतांनी यावेळी विचारला.

“महाराष्ट्र राज्य कसे अधोगतीला लागले आहे, ते आता रोजच उघड होत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना मासिक 1500 रुपयांची योजना जाहीर करताच ‘आता आपण जिंकलोच. राज्यातील सगळ्या बहिणी 1500 च्या बदल्यात बेइमान सरकारलाच मतदान करतील,’ या भ्रमात सरकारकर्ते आहेत. कर्जबाजारी राज्याचा सर्व निधी ‘लाडकी’ योजनेत वळवून सरकारने शिक्षण, आरोग्य खात्याचा गळा घोटला व हे चित्र भयंकर आहे. आपल्या दोन लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढीत चाललेल्या गरीब दांपत्याचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील हे चित्र आहे. मिंधे यांचे सरकार काय लायकीचे आहे व या राजवटीत जनता किती त्रस्त आहे ते गडचिरोली घटनेवरून दिसते”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“महाराष्ट्र राज्य सध्या ठेकेदारांच्या खिशात”

“आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. सरकारी आरोग्य व्यवस्थेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. शेवटी माता-पित्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर टाकून 15 किलोमीटर चिखल तुडवत अहेरीचे पत्तीगाव गाठले. गडचिरोलीत हे घडले. मात्र ते राज्यातील अनेक आदिवासी पाडे, वाड्यावस्त्यांवर घडत आहे. महाराष्ट्राचे हे चित्र मुख्यमंत्री व त्यांच्या टोळीला विचलित करीत नाही काय?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

“गेल्या अनेक वर्षांपासून सध्याचे मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी गडचिरोलीत नेमके काय कार्य केले? गडचिरोलीतील खाण उद्योगाचे मोठे साम्राज्य व त्यातून होणाऱ्या ‘खोके’ व्यवहारांवर नियंत्रण राहावे यासाठीच गडचिरोली त्यांना हवे आहे. बाकी मग मुलांची प्रेते खांद्यावर ठेवून लाडकी बहीण चिखल तुडवते याकडे त्यांचे लक्ष नाही. राज्याच्या चवचाल आरोग्य मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करावी असे हे प्रकरण आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कळवा येथील सरकारी रुग्णालयात अवघ्या एका महिन्यात 21 नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या वर्षी उघड झाला होता. खोकेबाज सरकारच्या काळात अशा अनेक लाडक्या बहिणींचे आणि त्यांच्या बाळांचे प्राण गेले. या लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या 1500 रुपये जमा झाले तरी त्यांच्या जीवनाचे हे दशावतार संपणार नाहीत. महाराष्ट्र राज्य सध्या ठेकेदारांच्या खिशात आहे व ही ठेकेदारी आरोग्य खात्यातही आहे”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

‘लाडकी बहीण’ योजना हा उतारा नाही

“संवेदना नसलेले राज्यकर्ते छातीवर बसल्यावर दुसरे काय व्हायचे? विदर्भातील गडचिरोलीत मुलांचे मृतदेह खांद्यावर टाकून आई-बाप जात आहेत व त्याच वेळी विदर्भातील भाजपचाच एक आमदार नर्तकीबरोबर ‘ठुमके’ घेत बेभान नाचताना दिसत आहे. इतके निर्घृण लोक ज्या सत्तेत आहेत त्यांच्या राज्यात निरपराध्यांचे जगणे हे किड्या-मुंग्यांसारखेच ठरते. आरोग्य व्यवस्थेचे बारा वाजलेच आहेत व त्यावर ‘लाडकी बहीण’ योजना हा उतारा नाही”, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.