Saamana Editorial : भ्रष्टाचाराविरूध्द कोणी बोलायचे ? सामनातून भाजपशासीत राज्यातील भ्रष्टाचारावर भाष्य
"हरयाणातील कॉंग्रेस (Haryana Congress) आमदारांनी भ्रष्टाचाराविरूद्ध लढा पुकारला आहे. कर्नाटकात (karnataka) भाजपचेच राज्य आहे. कर्नाटकातील मंत्री कमिशनसाठी छळ करीत असल्याची तक्रार करणाऱ्या एका कंत्राटदाराचा उडपी येथील संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे.
मुंबई – “हरयाणातील कॉंग्रेस (Haryana Congress) आमदारांनी भ्रष्टाचाराविरूद्ध लढा पुकारला आहे. कर्नाटकात (karnataka) भाजपचेच राज्य आहे. कर्नाटकातील मंत्री कमिशनसाठी छळ करीत असल्याची तक्रार करणाऱ्या एका कंत्राटदाराचा उडपी येथील संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. महाराष्टात भाजपच्या किरीट सोमय्याने (Kirit Somaiya) विक्रांत वाचवाच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले व त्या पैशांचा विनियोग खासगी कामासाठी केला. नागपूर महानगरपालिकेत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेतील गैरव्यवहारातील पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहेत ? कर्नाटक, हरयाणात भाजपाची सरकारे आहेत. तेथील भ्रष्टाचारावर कोणी बोलायचे ?” भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
हरियाणात राज्यात कोट्यावधी रूपयांचा घोटाळा
महाराष्ट्रात सरकार कसे भ्रष्टाचारी आहे. यावर भाजपचे भाडोत्री भोंगे रोज बोंबलत आहेत. त्या दिव्याखाली कसा अंधार असतो ते सुध्दा उघड झाले आहे. हरयाणा राज्यात भाजपाचे सरकार आहे. तिथं भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे. हरयाणात कॉंग्रेसच्या आमदारांनी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यासाठी अनोखी प्रतिज्ञा केली आहे. तसेच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर भ्रष्टाचाऱ्यांवरती जो पर्यंत कारवाई होणार नाही. तोपर्यंत चप्पल आणि शिवलेले कपडे सु्ध्दा घालणार नाही अशी प्रतिज्ञा आमदार शर्मा यांनी केली आहे. हरयाणात हजारो कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आणून देखील सरकार कारवाई करण्यास तयार नाही. हरयाणात झालेल्या घोटाळ्याची चौकशी खरंतर ईडीच्या ताब्यात द्यायला हवी. हे इतर राज्यातील आमदारांनी डोक्यात घ्यायला हवं असं देखील आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून घेतल्या मोठ्या रकमा
महाराष्ट्रात किरीट सोमय्यांनी विक्रांत वाचवाच्या नावाखाली पैसे गोळा केले. बिल्डरांकडून मोठ्या रकमा घेतल्या, पैसे खासगी कामासाठी वापरले. नागपूर माहापालीकेत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. पुणे पिंपरी- चिंचवड पालीकेतील गैरव्यवहारातील पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहे? एवढे सगळे भ्रष्टाचार भाजपच्या सत्ताधारी राज्यात आणि महापालिकेत होत आहे. या भ्रष्टाचारावर भाजप कधी बोलणार आहे ? असा खडा सवाल भाजपला सामनाच्या आग्रलेखातून विचारण्यात आला आहे.