मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत. वाढतं ऊन आणि सरकारची भूमिका यावर सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. “मान्सून रखडला आणि सूर्य कोपला अशा विचित्र कोंडीत सध्या देश सापडला आहे. पुन्हा ज्यांनी यातून जनतेची सुटका करायची ते राज्यकर्ते वेदनांवर फुंकर मारण्याऐवजी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग करीत आहेत, “, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशात लोक उष्माघाताने प्राण सोडत आहेत आणि तेथील दयाशंकर सिंह हे मंत्री ‘उन्हाळयात मृत्यूचे प्रमाण वाढतेच, यापूर्वीही हे होत आले आहे!’ असे तारे तोडत आहेत. देशात एकीकडे महागाई, बेरोजगारी, विद्वेषाचा वणवा पेटला आहे. दुसरीकडे सूर्य कोपला आहे. जनता त्यात होरपळून निघत आहे आणि राज्यकर्ते थंड आहेत. हे चित्र भयंकर आहे!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातही तीव्र उष्ण्याचा तडाखा जूनमध्येही जाणवत आहे. किंबहुना मुंबईच्या विक्रमी तापमानाची नोंद जूनमध्ये झाली. शनिवारचे सांताक्रुझचे कमाल तापमान हे जूनमधील मुंबईतील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान होते. रखडलेला मान्सून आणि वाढलेला उष्मा यासाठी ज्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाकडे बोट दाखविले गेले ते आता पाकिस्तानात सरकले आहे. मात्र तरीही त्यांचे ‘आफ्टर इफेक्ट्स’ देशाला जाणवत आहेत, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
देशातील उष्म्याची स्थिती कायमच आहे. त्यात आधी ‘एल निनो’चा इशारा आणि नंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला आहे. आता 23 जूननंतर मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होईल, असे सांगण्यात येत आहे. म्हणजे यंदा जवळजवळ पूर्ण जून महिना पावसाचा अभाव आणि उष्णतेचा प्रभाव’ असा जाणार आहे. त्याचा दुष्परिणाम पीकपेरणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ावर तर होणार आहेच, परंतु मान्सूनचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे देशाचा खरीप हंगामदेखील विस्कळीत होऊ शकतो, अशी चिंता सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सून रखडला आणि सूर्य कोपला अशा विचित्र कोंडीत सध्या देश सापडला आहे. पुन्हा ज्यांनी यातून जनतेची सुटका करायची ते राज्यकर्ते वेदनांवर फुंकर मारण्याऐवजी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग करीत आहेत. उत्तर प्रदेशात लोक उष्माघाताने प्राण सोडत आहेत आणि तेथील दयाशंकर सिंह हे मंत्री ‘उन्हाळयात मृत्यूचे प्रमाण वाढतेच, यापूर्वीही हे होत आले आहे!’ असे तारे तोडत आहेत. देशात एकीकडे महागाई, बेरोजगारी, विद्वेषाचा वणवा पेटला आहे. दुसरीकडे सूर्य कोपला आहे. जनता त्यात होरपळून निघत आहे आणि राज्यकर्ते थंड आहेत. हे चित्र भयंकर आहे!, असं म्हणत सामनातून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.