बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी कलंकित होऊ नये : सामना

उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याच मार्गाने जातील असे पैजा लावून सांगितले गेले. ते खरे ठरताना दिसत आहे." असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी कलंकित होऊ नये : सामना
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 10:10 AM

मुंबई : “विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करत आहे. काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजाराला उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरु आहे. भाजपकडे संपूर्ण देशाची सत्ता, काही घरे त्यांनी विरोधकांना सोडायला हवीत” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. “पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वत:ला कलंकित करुन घेऊ नये” असा सल्लाही राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना दिला आहे. (Saamana on Rajasthan Politics and Sachin Pilot)

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

“मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पडले. जिभेला लागलेले रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप आहे. मध्य प्रदेशचा घास गिळला तेव्हाच सगळ्यांना खात्री होती की, पुढचा नंबर राजस्थानचा आहे. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याच मार्गाने जातील असे पैजा लावून सांगितले गेले. ते खरे ठरताना दिसत आहे.” असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा : राजस्थानमधील बंडखोर आमदारांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल, सचिन पायलटांना किती आमदारांचा पाठिंबा?

“200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँगेसचे 107 आणि भाजपचे 72 आमदार आहेत. अपक्ष व इतर आमदारही सरकारबरोबर होते. त्यातले काही परंपरेप्रमाणे कुंपणावर जाऊन बसले आहेत. पायलट यांचा दावा असा की, काँगेसचे सरकार आता अल्पमतात आले आहे. पायलट यांचे म्हणणे खरे असले तरी सरकारचे भविष्य हे विधानसभेत ठरेल. काँगेस आमदारांची जी बैठक विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बोलावली, त्यास पायलट यांना मानणाऱ्या दहा-बारा आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे खरा आकडा हा विधानसभेत डोकी मोजल्यावरच कळेल. जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भाजप उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही” असेही अग्रलेखात म्हटले आहे.

“ज्योतिरादित्य शिंदे यांना फूस लावून फोडले तेव्हाही भाजपच्या दृष्टीने हा काँगेसअंतर्गत प्रश्नच होता व आता पायलट यांची खेळी हादेखील अंतर्गत प्रश्नच आहे. महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपने सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे अशा अंतर्गत बाबी सोयीप्रमाणे ठरत असतात. मुख्यमंत्री गहलोत यांनी भाजपवर जो घोडेबाजाराचा आरोप केला तो गंभीर आहे. एका एका आमदाराला पंचवीस कोटींची ऑफर दिली जात आहे व तसे व्यवहार सुरु आहेत, पण आता आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत त्या गहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर” याकडे अग्रलेखात लक्ष वेधले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“आज पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वत:ला कलंकित करुन घेऊ नये. पायलट यांचा अहंकार आणि व्यक्तीद्वेष राजस्थानसारखे राज्य अस्थिर करत आहे, पण केंद्रीय सत्तेची फूस पायलट यांना असल्याशिवाय ते शक्य नाही” असा दावाही केला आहे. (Saamana on Rajasthan Politics and Sachin Pilot)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.