इंदिराजींच्या स्मृती मिटवू पाहणाऱ्यांनाच आता त्यांच्या व्यक्तिमत्वाची काळजी : सामना

पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्वास पेढेवाले वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजुने संपुर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे

इंदिराजींच्या स्मृती मिटवू पाहणाऱ्यांनाच आता त्यांच्या व्यक्तिमत्वाची काळजी : सामना
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 8:06 AM

मुंबई : “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्वास पेढेवाले वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजुने संपुर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे”, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर करण्यात आली आहे (Saamana Editorial On Indira Gandhi).

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त खुलासे केले होते. इंदिरा गांधी या कुख्यात गुंड करीम लालाल भेटायला यायच्या, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या आक्षेपानंतर त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं. मात्र, भाजपने हा मुद्दा रेटून धरला. इतकंच नाही तर काँग्रेसचं इंदिरा गांधींवरील प्रेम कमी झालं असेल, पण आमचं नाही, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं. त्यावरुन आज ‘सामना’च्या अग्रलेखात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं.

“इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच. शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधीचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनुन मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना कधी इंदिरा गांधीचा. तुर्त इतके पुरे”, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.

“भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे आम्ही म्हणतो, ते कीती खरे आहे, याचे प्रत्यंतर आपल्या कृतीतून तो रोज देत आहेत. मुळ भाजप राहिला बाजुला पण भाजपात घुसलेल्या इरसाल “बाटग्यां”नी उठसूट सिलिंडर र करुन बांग देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. सत्ता हातून सटकल्याने निद्रानाशाचा रोग जडला हे समजु शकतो पण त्या निद्रानाशातुन त्यांना जे झटके व आचके येत आहेत, त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत. इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्रच्या इतिहासात निर्माण झाला नसेल. पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते तसा काहीसा प्रकार सुरु आहे. सोयीनुसार टोप्या घालण्याचे व बदलण्याचे काम सुरु आहे. मोदी यांची तुलना सातारच्या पेढेवाल्यांशी केली जाते हे जर भाजप नेत्तृवास बिनशर्त मान्य असेल तर प्रश्नच संपतो”, असा घणाघात आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.