सचिन अहिर यांना शिवसेनेत नवी जबाबदारी!

सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन अहिर यांना शिवसेनेत नवी जबाबदारी!
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 2:53 PM

मुंबई : राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन अहिर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन अहिर यांना शुभेच्छा दिल्या. (Sachin Ahir new responsibility in Shivsena)

‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.’ असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे आभार व्यक्त केले आहेत. (Sachin Ahir new responsibility in Shivsena)

राष्ट्रवादीचं मुंबई अध्यक्षपद भूषवत असताना सचिन अहिर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असं सूचक वक्तव्य शिवसेनाप्रवेशावेळी सचिन अहिर यांनी केलं होतं.

मुंबईमध्ये सचिन अहिर यांची मोठी ताकद पाहायला मिळाली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना विधानसभा निवडणूक जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. सचिन अहिर यांना त्याची बक्षिसीच शिवसेनेचं उपनेतेपद बहाल करुन देण्यात आली आहे.

सचिन अहिर कोण आहेत?

  • सचिन अहिर यांनी जुलै 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
  • सेनाप्रवेशापूर्वी अहिर यांचा राष्ट्रवादीत मोठा दबदबा होता.
  • 1999 मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार झाले
  • मामा अरुण गवळी यांनी सचिन अहिर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं.
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी विराजमान झाले.
  • अहिरांकडे वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजाचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला.
  • शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळी मतदारसंघात अहिर यांचा पराभव केला होता.
  • सचिन अहिर यांना राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
  • अहिर यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघात काम केले आहे.
  • इंटक कामगार युनियनचे अध्यक्षपदही सचिन अहिर यांनी भूषवले आहे.

Sachin Ahir new responsibility in Shivsena

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.