Sachin Pilot | राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी, सचिन पायलट यांची 9 शब्दात प्रतिक्रिया
"सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही" असे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे.
जयपूर : बंडखोरीच्या वाटेवर असलेले युवा नेते सचिन पायलट यांची काँग्रेसने अखेर राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली. त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. त्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटरवरुन पहिली प्रतिक्रिया दिली. (Sachin Pilot first Reaction after removing as Rajasthan Deputy Chief Minister)
“सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही” (सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं) असे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ ही माहितीही हटवली.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“सत्यवचन सचिन पायलट, तुम्ही भाजपसोबत मिळून सत्याला खूप त्रास दिलात, पण त्याला ना पराभूत करु शकलात, ना यापुढे करु शकाल, सत्यमेव जयते” असे प्रत्युत्तर राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी दिले आहे
सत्य वचन @SachinPilot ? आपने भाजपा के साथ मिलकर सत्य को काफी परेशान किया, लेकिन पराजित नहीं कर पाए न आगे कर पाएंगे । सत्यमेव जयते । https://t.co/DdJr5M6czp
— Avinash Pande (@avinashpandeinc) July 14, 2020
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्री, तर विश्वेंदरसिंग आणि रमेश मीणा यांना मंत्रीपदावरुन काढून टाकण्याचा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा प्रस्ताव मान्य केला आहे.
Sachin Pilot changes his bio on Twitter (pic 1) after being removed as Rajasthan Deputy Chief Minister and state Congress unit chief (Pic 2: earlier Twitter bio). pic.twitter.com/ro3UWqOdvN
— ANI (@ANI) July 14, 2020
जयपूर येथील काँग्रेसच्या मुख्यालयात असलेली सचिन पायलट यांच्या नावाची पाटीही त्यांच्या उचलबांगडीनंतर काढून टाकण्यात आली.
Rajasthan: Sachin Pilot’s nameplate removed from Congress headquarter in Jaipur after he was removed as Deputy CM and PCC Chief, Govind Singh Dotasra appointed as state unit chief. pic.twitter.com/m0Nzd6iSD3
— ANI (@ANI) July 14, 2020
राजस्थानच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ गोविंदसिंग डोटासरा यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे. गोविंदसिंग डोटासरा हे सध्या राजस्थानचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. ते राजस्थान सरकारमध्ये पर्यटन आणि देवस्थान मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळतात.
संबंधित बातम्या :
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी
(Sachin Pilot first Reaction after removing as Rajasthan Deputy Chief Minister)