Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात येताय, पण उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्या, योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर काँग्रेसचा निशाणा

महाराष्ट्रात येताय पण उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावरदेखील त्यांनी लक्ष द्यावं, असा टोला सचिन सांवत यांनी लगावला आहे. (Sachin Sawant Yogi Adityanath)

महाराष्ट्रात येताय, पण उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्या, योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर काँग्रेसचा निशाणा
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 7:09 PM

मुंबई :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना माझा सल्ला आहे की, महाराष्ट्रात येताय पण उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावरदेखील त्यांनी लक्ष द्यावं,” असा खोचक टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना लगावला. ते मुंबईत ‘टीवी 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली. (Sachin Sawant on Yogi Adityanath visit of Maharashtra)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याविषयी सचिन सावंत बोलत होते.

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत येणार आहेत. बॉलिवूड निर्णात्यांसोबत तसेच राज्यातील उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत. एकंदरीत उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आमचा त्यांना सल्ला आहे की, उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. या विषयाकडेदेखील त्यांनी लक्ष केंद्रीत करावं,” असं सचिन सावंत म्हणाले. यावेळी, योगी यांच्या भेटीनंतर बॉलिवूडधील निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती केली जाऊ शकते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

तुमची समाजात विघटन करण्याची भाषा

यावेळी सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भाषा विघटनवादी असल्याचा आरोप त्यांनी केला. “तुमची भाषा सामाजिक एकी ठेवण्याची नाही. तर तुमची भाषा ही समाजात विघटन निर्माण करण्याची आहे,” असा आरोप सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केला. (Sachin Sawant on Yogi Adityanath visit of Maharashtra)

बॉलिवूडधील निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती केली जाऊ शकते

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माहाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना, यानंतर बॉलिवूड निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती केली जाऊ शकते, असा गंभीर आरोप केला. तसेच, महाराष्ट्राच्या सरकारने असं काही होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले.

योगी आदित्यनाथ यांचा दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे  ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील.

संबंधित बातम्या : उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कठोर कायद्याला राज्यपालांची मंजुरी

’28 व्या क्रमांकावरील पिछाडीचं राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवतंय’, केसीआर यांचा आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे भाग्यनगर होणार नाही, ओवेसींचा आदित्यनाथांना इशारा

(Sachin Sawant on Yogi Adityanath visit of Maharashtra)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.